कोकणातील आंबा व काजू बागायतदार (शेतकरी) यांचे अवकाळी पावसामुळे व बदलत्या वातावरणामुळे जे नुकसान झालेले आहे. आंबा व काजू बागायतदारांना अवकाळी पावसामुळे व बदलत्या वातावरणामुळे अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याची भरपाई मिळावी म्हणून हवालदिल झालेल्या उत्पादकांच्या शिष्टमंडळाने शिवसेनापक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली.
कोकणातील आंबा, काजू उत्पादकांच्या न्याय मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मोर्चाद्वारे जाऊन भेट घेण्याचे कोकणातील शेतकऱ्यांनी ठरविले. त्यानुसार शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी सायं. ४ वा. गिरगाव चौपाटी ते वर्षा निवास असा मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्च्यात हजारो आंबा, काजू बागायतदार पूर्ण ताकदीने न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत.
मोर्चा यशस्वी करण्याकरिता मुंबई, ठाणे, कल्याण येथील कोकणवासीयांची तातडीची बैठक पक्षप्रमुख उद्धवजींच्या आदेशाने मंगळवार दि. १२ मे २०२६ रोजी सायं. ६ वा. शिवसेनाभवन, दादर, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. या बैठकीत नेते, सचिव, विनायक राऊत, नेते आ. अनिल परब, नेते, आ. सुनिल प्रभु, उपनेते, अरुण दुधवडकर, आ. महेश सावंत, विभागप्रमुख रमेश कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार
आहे.
तरी सर्व मुंबई, ठाणे, कल्याण कोकणवायीय पदाधिकारी तसेच पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात पक्षाच्या वतीने करण्यात आलेले आहे.अशी प्रसिद्धीपत्रकाव्दारे शिवसेना उबाठा चे सचिव
नेते विनायक राऊत यांनी माहिती दिली आहे.


















