Home मुंबई *पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोट्यवधी रुपयांच्या दुबार खर्चाची चौकशी करा!*

*पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोट्यवधी रुपयांच्या दुबार खर्चाची चौकशी करा!*

86
0

*स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांच्या आक्षेपानंतर प्रस्ताव रोखला*

मुंबई,
मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रभाग क्रमांक ४७ चे नगरसेवक तजिंदर सिंग तिवाना यांनी पूर्व द्रुतगती महामार्गावर (Eastern Express Highway) करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली.
तिवाना यांनी सांगितले की, नोव्हेंबर २०२२ पासून महानगरपालिकेच्या ताब्यात आलेल्या या महामार्गावर खड्डेमुक्ती आणि दुरुस्तीच्या नावाखाली प्रचंड खर्च करण्यात आला आहे.
२०२३ मध्ये पावसाळ्यापूर्वीच्या डागडुजीसाठी सुमारे ₹९३ कोटी खर्च करण्यात आले, जे नंतर वाढून ₹१०९ कोटी झाले (कंत्राटदार: के. आर. कन्स्ट्रक्शन, हमी कालावधी – २ वर्षे).
२०२४ मध्ये विविध कामांसाठी पुन्हा मोठ्या प्रमाणावर खर्च:
सर्व्हिस रोड दुरुस्ती (मास्टिक) – ₹८५ कोटी
मास्टिक सुधारणा – ₹१८ कोटी
जिओ-पॉलिमर सुधारणा – ₹९ कोटी
मायक्रो सरफेसिंग – ₹४६.३१ कोटी
तिवाना यांनी प्रश्न उपस्थित केला की, एवढा प्रचंड खर्च करूनही जर पुन्हा ₹६३ कोटींचे मायक्रो सरफेसिंगचे काम देण्यात येत असेल, तर यापूर्वी केलेल्या कामांची गुणवत्ता आणि उपयोगिता काय होती?
तसेच, आधीच्या कामांवर अजूनही हमी कालावधी लागू असताना नव्याने काम देणे म्हणजे जुन्या कामांच्या हमी कालावधीला बगल देण्याचा प्रयत्न आहे का, असा सवाल त्यांनी केला.
मागील वर्षी मायक्रो सरफेसिंगसाठी खर्च करण्यात आलेल्या सुमारे ₹४३ कोटींच्या कामाची सद्यस्थिती काय आहे, याचीही माहिती देण्याची त्यांनी मागणी केली.
तिवाना यांनी सांगितले की,
“सन २०२३ पासून खड्डे दुरुस्तीवर झालेल्या सर्व खर्चाची आणि संबंधित कंत्राटदारांची सखोल चौकशी करण्यात यावी. त्या काळात प्रशासकीय स्तरावर मनमानी पद्धतीने निर्णय घेतले गेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच यामध्ये काही भ्रष्टाचार झाला आहे का याची देखील चौकशी करावी अशी मागणी केली.”
त्यामुळे या सर्व कामांची गुणवत्ता, खर्च आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी स्वतंत्र चौकशी करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here