*पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी हुतात्मा स्मारकावर वाहिले पुष्पचक्र…*
मुंबई दि. १ मे – राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज महाराष्ट्र दिन पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष खा
सुनिल तटकरे यांच्या हस्ते झेंडावंदन करुन साजरा करण्यात आला.
प्रदेश कार्यालयात झेंडावंदन झाल्यावर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे व सर्व पदाधिकाऱ्यांनी हुतात्मा स्मारकावर जाऊन पुष्पचक्र अर्पण केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार सना मलिक-शेख, आमदार झिशान सिद्दीकी, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, सिध्दार्थ कांबळे, प्रदेश प्रतिनिधी संजय तटकरे, संतोष धुवाळी, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र लावंघरे, कार्याध्यक्ष शिवाजीराव बनकर, मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष आदींसह पक्षाचे महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















