Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा धमाल बोक्याला मिळणार कमाल आजी! ‘बोक्या सातबंडे २.०’ मध्ये वनिता खरात!

धमाल बोक्याला मिळणार कमाल आजी! ‘बोक्या सातबंडे २.०’ मध्ये वनिता खरात!

18
0

दिलीप प्रभावळकर यांच्या लेखणीतून उतरलेला आणि लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचा लाडका असलेला
बोक्या सातबंडे’ पुन्हा एकदा रंगभूमीवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. पण यावेळी हे पुनरागमन साधेसुधे नाही, तर ते२.० (अद्ययावत) स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या इनिंगचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम आणि दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री वनिता खरात!
वनिता खरात आता बोक्याच्या नटखट आजी च्या भूमिकेत दिसणार आहे. स्वतःची वेगळी ब्रँड व्हॅल्यू निर्माण केलेल्या वनिताच्या येण्याने नाटकात विनोदाची आणि प्रेमाची अधिकच रंगत वाढणार आहे. आरुष बेडेकरचा खोडकर बोक्या आणि त्याला साथ देणारी वनिताची ‘कमाल आजी’ ही जोडी रंगभूमीवर काय धमाल करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
तर
बोक्याच्या वडिलांची (बाबांची) भूमिका अभिनेता प्रणव जोशी साकारत आहेत. अभिनयाचा दांडगा अनुभव असलेल्या प्रणव जोशी यांनी यापूर्वी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर आपले नाव दर्जेदार अभिनय, आणि दिग्दर्शन या क्षेत्रात उल्लेखनीय कमावले आहे.

मिलाप थिएटर निर्मित ‘बोक्या सातबंडे’ नाटकाने आतापर्यंत अनेक महाराष्ट्रा बाहेर सुद्धा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
आता या नाटकाचे ४थे सेशन सुरू होत आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी हे मर्यादित प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.
डॉ. निलेश माने यांचे लेखन, दिग्दर्शनविक्रम पाटील आणि दीप्ती जोशी यांची आहे.
संगीत:निनाद म्हैसळकर, नेपथ्य :संदेश बेंद्रे,वेशभूषा:महेश शेरला, प्रकाश योजना:राहुल जोगळेकर,नृत्य: संतोष भांगरे –
२२ एप्रिल, सकाळी ११ गडकरी रंगायतन ठाणे, २३ एप्रिल, रात्री ८ वा, दिनानाथ नाट्यगृह पार्ले,
२५ एप्रिल, दुपारी १२.३० वा. रामकृष्ण मोरे, नाट्यगृह, चिंचवड येथे प्रयोग होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here