नांदोशी प्रकल्पाचे ‘लता आशा मंगेशकर इंस्टिट्यूट ऑफ़ मेडिकल सायन्सेस ’ असे नामांतर हृदयनाथ मंगेशकर – डॉ. धनंजय केळकर यांनी जाहीर केल
एक महत्त्वपुर्ण आणि भावनिक घडामोडीत, ‘लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन’ च्या विश्वस्त मंडळाने पुण्याजवळील नांदोशी येथील आगामी रुग्णालय प्रकल्पाचे नाव ‘लताआशा मंगेशकर इंस्टिट्यूट ऑफ़ मेडिकल सायन्सेस’ असे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवार, १२ एप्रिल रोजी आशा भोसले जी यांच्या निधनानंतर, नियोजित कार्यक्रमात आता फाऊंडेशन
भूमिपूजन समारंभासोबतच श्रद्धांजली सभा देखील आयोजित करण्यात येणार आहे, ज्यामुळे हा कार्यक्रम श्रद्धांजली आणि भविष्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल ठरेल.
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत भूषवणार आहेत. मंगेशकर आणि भोसले कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहेत.
हा निमंत्रणावर आधारित कार्यक्रम गुरुवार, १६एप्रिल रोजी सायं. ५ वाजता नांदोशी येथील सिंहगड रोडवरील प्रकल्प स्थळी आयोजित करण्यात येणार आहे.
या प्रसंगी पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले,
“लता दिदी आणि आशा ताई आमच्यासाठी कधीच फक्त नावे नव्हती… त्या आमचा श्वास होत्या.
“या रुग्णालयाला त्या दोघींची नावे देणे योग्य वाटते. हे लता दिदी आणि आशा ताई यांच्या नावाने असेल, आणि आम्ही ते आशियातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक बनवण्याचा प्रयत्न करू.
“अशा वेळी, कर्तव्य पार पाडणे महत्त्वाचे वाटले आणि वैयक्तिक दुःखापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणे योग्य वाटले.
“आशा भोसले जी उद्घाटनासाठी येणार होत्या, कारण आम्ही लतादीदींच्या नावाने रुग्णालय उभारत होतो, जसे त्यांनी आमच्या दिवंगत वडिलांच्या नावाने एक उभारले होते.”
यावेळी त्यांनी प्रकल्पाविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, ४० एकरांचा हा प्रकल्प केवळ रुग्णांची सेवा करणार नाही, तर लहान प्राण्यांच्या उपचारांचाही समावेश असेल.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चे मेडिकल डायरेक्टर डॉ. धनंजय केळकर यांनी पुढे सांगितले,
‘लता आशा मंगेशकर इंस्टिट्यूट ऑफ़ मेडिकल सायन्सेस ‘
साठी आम्ही ४० एकर जमीन खरेदी केली आहे, जिथे विविध संस्था एकत्रितपणे एकात्मिक पद्धतीने कार्य करतील.
“पहिल्या टप्प्यात २२.५ लाख चौरस फूट बांधकाम होईल, ज्यामध्ये १००० खाटांचे सर्जिकल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असेल.
“हे अत्याधुनिक,
स्टेट-ऑफ-द-आर्ट असेल — आणि देशातील सर्वात आधुनिक विशेषज्ज्ञ शस्त्रक्रिया रुग्णालयांपैकी एक असेल.”
लता मंगेशकर आणि आशा भोसले या भारतीय संगीत क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांपैकी आहेत. त्यांच्या संयुक्त नावाने उभारले जाणारे हे संस्थान सेवा, करुणा आणि आरोग्य यांद्वारे त्यांच्या वारशाला पुढे नेईल.
या प्रसंगी सायं. ४ वाजता एक संगीतमय श्रद्धांजली देखील आयोजित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये विभावरी जोशी (गायन), शांतनू गोखले (संतूर), अमर ओक (बासरी), आणि पांडुरंग पवार (तबला) यांचे सादरीकरण होईल.

















