Home मुंबई *मानखुर्द येथील बॉम्बे सोप फॅक्टरी जागेवरील १४०० अनधिकृत झोपड्यांचे निष्कासन*

*मानखुर्द येथील बॉम्बे सोप फॅक्टरी जागेवरील १४०० अनधिकृत झोपड्यांचे निष्कासन*

15
0

*• मुंबई मनपा आणि मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय यांची संयुक्त कारवाई*

घाटकोपर-मानखुर्द जोड मार्गालगत असलेल्या मानखुर्द येथील बॉम्बे सोप फॅक्टरी (डब्बा कंपनी) या शासकीय जागेवरील १४०० अनधिकृत झोपड्यांचे बुधवार दि.८ एप्रिल २०२६ रोजी निष्कासन करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ‘एम पूर्व’ प्रशासकीय विभाग आणि मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ५० अन्वये घाटकोपर-मानखुर्द जोड मार्गालगत असलेल्या मानखुर्द येथील बॉम्बे सोप फॅक्टरी (डब्बा कंपनी) या शासकीय जागेवरील झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन) पूर्व उपनगरे यांनी निर्देशित केले होते.

त्यानुसार, महानगरपालिकेचे सह आयुक्त (परिमंडळ-५) देविदास क्षीरसागर, सहायक आयुक्त (एम पूर्व) उज्ज्वल इंगोले यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एम पूर्व’ प्रशासकीय विभागाने ही कारवाई केली. इमारत व कारखाना विभागातील सहायक कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांची या कारवाईसाठी नेमणूक करण्यात आली होती. तसेच, सुमारे २०० कामगारांसह ३ पोकलेन, ७ जेसीबी, १० डंपर, २ ड्रोन कॅमेरे आदी यंत्रसामग्री पुरविण्यात आली. यावेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

‘एम पूर्व’ प्रशासकीय विभागातील घाटकोपर-मानखुर्द या जोड मार्गालगत असलेल्या मानखुर्द (ता. कुर्ला) येथील नगरभूमापन क्रमांक १/२ (पै) या मिळकतीवर बॉम्बे सोप फॅक्टरी (डब्बा कंपनी) हे सुमारे २२ एकर जमीन क्षेत्र असून त्यावर अनधिकृतपणे झोपड्या बांधण्यात आल्या होत्या.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here