Home Uncategorized *निवडणुकीत केलेल्या आरोपांवरून भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी मुंबई उच्च न्यायालयात मागितली...

*निवडणुकीत केलेल्या आरोपांवरून भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी मुंबई उच्च न्यायालयात मागितली माफी!

27
0

न्यायालयाने मनाई करून देखील काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांच्या संस्थेवर आरोप करणे मेहतांना भोवले

भाईंदर – काँग्रेसचे नेते व माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या संस्थेविरुद्ध खोटे आरोप केले म्हणून मुंबई उच्च न्यायालयात भाजपचे आमदार नरेंद्र मेहतां विरुद्ध मानहानीचा दावा दाखल आहे. न्यायालयानेही मेहतांना संस्थे विरुद्ध पुन्हा चुकीची वक्तव्ये करू नयेत म्हणून मनाई केलेली आहे. तरीदेखील मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला झुगारून मेहतांनी महापालिका निवडणुकी दरम्यान हुसेन यांच्या संस्थे विरुद्ध जाहीर सभेत वक्तव्ये केली.
त्यावर अवमानना याचिका दाखल केली असता आ. नरेंद्र मेहता यांना न्यायालयात लेखी माफीनामा द्यावा लागला.
आमदार मेहता यांनी मिरारोड येथील ‘उमराव इन्स्टिट्यूट योग्य मेडिकल सायन्स रिसर्च सेंटर’ रुग्णालयाच्या संदर्भात काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन यांच्यावर आरोप केले होते. २०१९ साली हुसेन हे मेहता विरुद्ध विधानसभा निवडणूक लढवत होते. आपल्या आणि संस्थेबद्दल खोटे आरोप करून जनतेत संभ्रम पसरवून निवडणूक जिंकण्यासाठी हा खटाटोप केल्याचा आरोप हुसेन यांनी केला होता. २०१९ साली उमराव इन्स्टिट्यूट संस्थेने नरेंद्र मेहतांवर २५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यावेळी पुन्हा संस्थेबद्दल चुकीची वक्तव्ये करू नयेत, असे मनाई आदेश न्यायालयाने मेहतांना होते.

न्यायालयाच्या मनाई आदेश नंतरदेखील आ. नरेंद्र मेहता यांनी महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळी दरम्यान नोव्हेंबर २०२५ मध्ये एका जाहीर सभेत पुन्हा मुझफ्फर हुसेन व त्यांच्या संस्थेवर आरोप करतानाच अनेक रुग्णांची नावे जाहीर केली होती. त्यामुळे संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.

अडचणीत आलेल्या आमदार नरेंद्र मेहता यांनी मुंबई उच्च न्यायालयात सपशेल माफी मागत लेखी शपथपत्र देखील सादर केले. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या न्यायालयीन सुनावणीत भाजपचे आ. नरेंद्र मेहता यांनी न्यायालयात शपथपत्र सादर करून बिनशर्त माफी मागितली असल्याने न्यायालयाने तो माफीनामा स्वीकारला. तसेच यापुढे भविष्यात अशा प्रकारचे व्हिडीओ पोस्ट किंवा किंवा इतर तत्सम विधाने, वक्तव्य करणार नसल्याचेही मेहतांनी न्यायालयाला आश्वासन दिले.

मेहतांनी न्यायालयात लिहून दिलेली माफी व शपथपत्रातली आश्वासने नोंदवून घेण्यात येत असून ती न्यायालयाप्रती केलेली बंधनकारक वचनबद्धता मानली जाते. तर संस्थेने देखील फारसे ताणल्याने माफीनाम्यावर मेहतांचे निभावले. अवमानना याचिका निकाली काढली गेली असली तरी मूळ मेहतां विरुद्धची याचिका सुरूच राहणार आहे.

या बाबत मुझफ्फर हुसेन यांनी सांगितले की, “भाजपाच्या नरेंद्र मेहतांना निवडणूक जिंकण्यासाठी पासून स्वतः वर असलेले अनेक दाखल गुन्हे, घोटाळे वरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी खोटी नाटी वक्तव्ये करण्याची सवय आहे. लोकांची दिशाभूल करून संभ्रम तयार करून आपण स्वच्छ आहोत व समोरचा चुकीचा आहे हे दाखवण्याचा खटाटोप ते कोणत्याही थराला जाऊन करत असतात. मुंबई उच्च न्यायालयातील त्यांच्या माफीनाम्याने ते आता तरी सुधरतील व चांगली कर्म करतील अशी अपेक्षा आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here