Home मुंबई *प्रभात मित्र मंडळात ८ मार्च जागतिक महिला दिन उत्साहात साजरा!*

*प्रभात मित्र मंडळात ८ मार्च जागतिक महिला दिन उत्साहात साजरा!*

127
0

मुंबई : विक्रोळी कन्नमवार नगरातील ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळात ८ मार्च चा जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी विभागातील शैक्षणिक,सामाजिक, राजकीय,क्रीडाविषयक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष विवेक गायकवाड होते.प्रमुख पाहुण्या म्हणून दैनिक द ग्लोबल टाईम्स च्या कार्यकारी संपादक शीतल हरीष करदेकर तर विशेष अतिथी म्हणून नगरसेविका सुनिता चंद्रशेखर जाधव होत्या.नगरसेविका जाधव यांची
मुंबई महानगर पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह शाल,व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.शीतल हरीष करदेकर यांना सन्मानचिन्ह,शाल व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे यांनी केले.
“महिला दिन हा रोजचाच, महिलांचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी दिलेला वैश्विक लढा महत्त्वाचा, पण केवळ स्त्रीमुक्तीपेक्षा ,दोघांच्या साथीने संसार होतो. गुणवंत स्त्रीचा सत्कार करताना तिच्या पाठीशी ,सोबत असणार्‍या जोडीदाराचाही सत्कार होणे आवश्यक!” असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या द ग्लोबल टाइम्स च्या कार्यकारी संपादक शीतल हरीष करदेकर यांनी केले.
“समाजात विकृती वाढतेय, तांत्रिक प्रगती होतेय, हातातल्या फोनवर आपला मुलगामुलगी काय करते याकडे आई – वडिलांचं लक्ष असायलाच हवं. धर्मवादात न अडकता आपल्या मुलांना समाजात योग्य वावरण्याची कला शिकवणे ही मोठी जबाबदारी आहे. स्त्रीबिजाच्या माफियागिरीपर्यंत निर्लज्ज विकृत लोक पोहोचलेत आणि म्हणूनच मुलींना जगण्याची कला नी सावधानता कळणे ही आजची गरज आहे. म्हणून पालकांची जबाबदारी मोठी आहे. ” याविषयी सविस्तर बोलून “मराठी भाषा ,मराठीपण टिकवायचं तर मराठीतून व्यक्त होणं, साहित्य, ग्रंथालये मजबूत करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.” असेही करदेकर यांनी सांगितले.
याप्रसंगी डाॅ अनघा विनय राऊत,डाॅ.मनीषा प्रनिल नायर, डाॅ.रश्मी जीवन जाधव,डाॅ.मंगला सुनिल जाधव,ॲडव्होकेट ज्योती दुराफे,केतकी अरविंद सांगळे,अहिल्या सोपान थोरवे,प्रज्ञा गितेश कदम,खेळाडू साक्षी गितेश कदम,आसावरी प्रमोद भोईटे,अनुराधा अनिल कल्याणकर,गायिका स्वप्ना मुरलीधर रोकडे,स्नेहल दिलिप कांबळे,वृंदा वाघमारे,ॲडव्होकेट गाथा ढाले,श्रध्दा सुभाष रुके,सुनिता अंकुश वीर,पत्रकार सहिष्णुता शरद कांबळे,पत्रकार नयन नासिकेत पानसरे आदिंना सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.मंडळाचे अध्यक्ष विवेक गायकवाड व ॲडव्होकेट ज्योती दुराफे यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंडळाचे माजी अध्यक्ष व विद्यमान कार्यकारिणी सदस्य सुरेश सरनोबत यांनी केले होते.आभार मंडळाचे उपाध्यक्ष निवृत्ती मस्के यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,खजिनदार गौतम नि.डांगळे,उपसचिव श्रध्दानंद निकम,सदस्य भूमय्या सोमा,बबन माने,पोपट साठे,विलास देशनेहरे,संजय मयेकर आदिंनी मेहनत घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here