Home मनोरंजन प्रसिद्ध लावण्यावती आकांशा कदम यांना लावणीसादर करायला बोलवून केला लावणीचा अपमान…!*

प्रसिद्ध लावण्यावती आकांशा कदम यांना लावणीसादर करायला बोलवून केला लावणीचा अपमान…!*

286
0

 

मुंबई प्रतिनिधी -. गणेश तळेकर

*प्रसिद्ध लावण्यावती आकांशा कदम यांना लावणीसादर करायला बोलवून केला लावणीचा अपमान…!*

लावणी ही महाराष्ट्राची शान आहे… या महाराष्ट्र मधे लावणीला मान सन्मान दिला जातो. आणि याच लावणीला ऐका राजकीय स्टेज वर कार्यक्रम चांगला सादर होत असताना आयोजकांनी खोटे बोलून शिंदेगट प्रवक्ता शितल म्हात्रे मॅडम ना जायला उशीर होत आहे असे बोलून लावणी थांबवून शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्ता शितल म्हात्रे यांना भाषण करायला दिले तेव्हा मॅडमनी एक स्टेटमेंट दिले. कि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या दरबारात कधी स्त्रिया नाचवल्या नाहीत, असे त्या म्हणाल्या आणि निघून जाताना त्यांच्या आयोजकाकडे निरोप देऊन सांगितले कि कार्यक्रम सुरेख चालू आहे , त्या कार्यक्रम मधे लावणी सादर करून कार्यक्रमाला गालबोट लावू नका. ही बातमी जशी लावण्यावती आकांशा कदम यांना कळली. त्यांच्या जीवाला हे वाक्य लागले, हा त्यांचा आणि लावणीचा मोठा अपमान केला गेला आहे.आकांक्षा कदम ना यांचे खूप वाईट वाटले.
आज प्रसिद्ध लावण्यावती आकांशा कदम यांनी त्यांची २५ वर्ष आयुष्य लावणी साठी दिले. त्या कार्यक्रम सोडून सरळ तिथून घरी निघून आल्या. त्यांनी सांस्कृतिक विभाग मंत्री आणि मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन आणि रसिक प्रेषक यांच्याकडे आता त्या न्याय मागत आहे….! कोण चुकले, कोण बरोबर. आता तुम्हीच सांगा…?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here