Home Uncategorized प्रदेश भाजपा पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली घोषणा

प्रदेश भाजपा पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली घोषणा

54
0

१२ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १२ चिटणीस,कोषाध्यक्ष, विविध मोर्चांच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. १२ उपाध्यक्ष, ६सरचिटणीस,१२ चिटणीस, कोषाध्यक्ष, सह कोषाध्यक्ष, मुख्य प्रवक्ता, विविध मोर्चाच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. जुन्या आणि नव्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे चव्हाण म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय संघटन मंत्री बी. एल.संतोष, सह संघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रमुख नेते यांच्याशी चर्चा केल्यानंतर या कार्यकारिणीची घोषणा केल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.
यावेळी, चव्हाण म्हणाले की “पाठोपाठ लागलेल्या निवडणुकांच्या आचार संहितेमुळे कार्यकारिणीची घोषणा लांबणीवर पडली होती. निवडणुकांची धामधूम संपल्यानंतर भाजपाला बळकटी देऊन भाजपाची विचारधारा तळागाळात पोहोचवण्यासाठी नव्या कार्यकारिणीची गरज लक्षात घेऊन घोषणा करण्यात आली आहे. ”
प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील, अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेश सरचिटणीस म्हणून आ.निरंजन डावखरे, आ.योगेश सागर, आ. संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे या सहा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य प्रवक्ते म्हणून नवनाथ बन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here