Home Uncategorized *वर्सोवा-मढ येथील विकासकामांची मंत्री नितेश राणेंनी केली पाहणी*

*वर्सोवा-मढ येथील विकासकामांची मंत्री नितेश राणेंनी केली पाहणी*

49
0

*वर्सोवा-मढ येथील विकासकामांची मंत्री नितेश राणेंनी केली पाहणी

*नागरिकांच्या सुविधांसाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचा घेतला आढावा*

मुंबई
वर्सोवा मढ परिसरात बंदरे विभागाअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कामांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान मंत्री नितेश राणे यांनी कामांची सद्यस्थिती, प्रगती व गुणवत्तेबाबत माहिती घेतली. सर्व विकासकामे ठरलेल्या कालमर्यादेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

*वर्सोवा-मढ परिसरात सुरू असलेली विविध विकासकामे*

वर्सोवा व मढ येथे रु.१.४७ कोटी खर्च करून आधुनिक तरंगत्या जेट्टीचे निर्माण करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक तरंगत्या साहित्याची खरेदी प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर असून, लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. तरंगत्या जेट्टीच्या सभोवतालच्या परिसराचे रु. ३.२१ कोटी रुपये निधीतून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री एकत्रित करण्याचे काम सध्या सुरू असून, परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यात येणार आहे. वर्सोवा येथे मच्छीमार बांधवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मासेमारी प्लॅटफॉर्म मजबूत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सुमारे रु. ३.५० कोटी खर्चून हा प्रकल्प राबवण्यात येत असून, यामुळे मच्छीमारांना अधिक सुरक्षित व सुलभ सुविधा उपलब्ध होणार आहेत.

*वर्सोवा मासेमारी बंदरासाठी ४९९ कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे*

वर्सोवा मासेमारी बंदराच्या सर्वांगीण विकासासाठी रु. ४९९ कोटी खर्चाचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी भारत सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे वर्सोवा परिसरातील मत्स्यव्यवसायाला मोठी चालना मिळणार असल्याची ग्वाही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here