Home मुंबई *पोलादपूर तालुक्यातील रस्त्यांचे डांबरीकरण होणार*

*पोलादपूर तालुक्यातील रस्त्यांचे डांबरीकरण होणार*

58
0

*सीआरएफ फंडातून निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश*

*भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकरांनी केलेला पत्रव्यवहार*

मुंबई – रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. रस्ते खराब असल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. त्यामुळे या रस्त्यांचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे. त्यानुसार भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे पोलादपूर तालुक्यातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी सीआरएफ फंडातून निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली होती. आ. दरेकर यांच्या मागणीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.

आमदार प्रवीण दरेकर यांनी पोलादपूर तालुक्यातील निकृष्ट आणि खराब असलेल्या रस्त्यांच्या दुर्दशेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी १० फेब्रुवारी २०२६ रोजी पत्रव्यवहार केला होता. या पत्रात त्यांनी तालुक्यातील महालगूर ते गोलदरामार्गे पळचिल, गोळेगणी फाटा ते परसूले व परसूले आरोग्य केंद्र, कोतवाल फाटा ते कुडपण खुर्द (शेलारवाडी) आणि पोलादपूर-गोवा महामार्गावरून सडवली गावापर्यंत रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी सीआरएफ फंडातून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली होती. आ. दरेकर यांच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या या निर्देशांमुळे पोलादपूर तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here