निवृत्तीनंतरचा काळ व्हावा सुखाचा, असं सर्वांनाच वाटतं, अनेक वर्ष जेव्हा एखादी व्यक्ती काम करून निवृत्त होते त्यानंतर सकाळी नऊ ते संध्याकाळी सात पर्यंतचा वेळ कसा घालवायचा? याचे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात, त्यातून काहीजण टीव्ही पुढे, काहीजण मोबाईल धरून,काहीजण नेट चा ध्यास धरून, तर काहीजण गप्पाष्टक रंगवून आपला दिवस व्यतीत करतात, तर काहीजण छोटे-छोटे व्यवसाय किंवा छोट्या वेळाची नोकरी करत आपलं आयुष्य घालवण्याचा प्रयत्न करतात,यामध्ये काही वेळा विचारांचे स्वातंत्र्य असतं ,पण काही वेळा गरजही असते, अशा या मानसिक स्थितीमध्ये मन उस्फुर्त ,आनंदी राहण्यासाठी नाटकाचा तास ही संकल्पना प्रा. देवदत्त पाठक यांनी मांडली, केले जे सिक्सटी प्लस आहेत ,अशांना घेऊन दोन तासाचं ‘आनंदी उत्तरायण’ नावाचं नाटकाच्या तासाचं म्हणजेच रंगमंचिय खेळांचं सत्र जेष्ठांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि ताजा तवाने करण्यासाठी ते घेत असतात ,नुकत्याच टिळक रोड सदाशिव पेठच्या रोटरी क्लब ने प्रा.देवदत्त पाठक यांचे नाटकाच्या तासाचं सत्र जेष्ठांचे उत्तरायण आनंदी करण्यासाठी घेतलं,यामध्ये आपल्या आयुष्यात भेटलेली माणसं ,किंवा न भेटलेली माणसं, त्यांच्याशी थोडं बोलून बघत, नंतर लहानपणी आपण कुठल्या नावाने संबोधले जातो याची चेष्टा कशी होते ,तसेच कल्पनेमध्ये रमून काही काळ तरी एक कलात्मक अभिव्यक्ती अनेक विषयांवरचे नाटक निर्माण करण्यासाठी प्रयत्न यासाठी कितीतरी रंग मंचीय खेळ या व्याख्यानात, ज्येष्ठांकडून खेळवले गेले,
ज्येष्ठांनी आपलं उत्तरायण आनंदी कसं करावं हे समजून घेतलं .
आपल्या वयापेक्षा छोटे होऊन आनंदाने जगण्याचा अनुभव या काळात ज्येष्ठांनी घेतला,
काहींनी आपल्याला शारीरिक त्रास होत असला तरीसुद्धा खुर्चीमध्ये बसून हे रंगमंचीय खेळ खेळले,
आणि त्यातूनच उतारावयामध्ये सुद्धा आपण कुठल्या प्रकारचा ताण तणाव टाळण्यासाठी रंगमंच खेळ घरामध्ये, सोसायटीमध्ये, कसे खेळू शकतो याचा अनुभव जेष्ठानी यानिमित्ताने घेतला .
रोटरी क्लब ऑफ टिळक रोड चे अध्यक्ष डॉ. देवदत्त हंबर्डीकर यांनी या सत्राचे आयोजन केले त्याला रोटरी क्लब च्या जवळ जवळ ५०ज्येष्ठांनी सहभागी होऊन स्वतःचे राहून गेले ला आनंद लुटला
या निमित्ताने भरपूर बोलून घेतले आपले मनातील दुःख सुख एकमेकांना शेअर केले. बोलायला मिळणे सुसंवाद करणे आणि त्यातून आपला वर्तमान समृद्ध करणे यासाठी नाटकाचा तास रंग मंचीय खेळांचा उपयोग होत आहे अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवर जेष्ठांनी या निमित्ताने दिले.
खास ज्येष्ठांसाठीच अशा प्रकारच्या प्रयोग सत्राचा उपयोग करण्यासाठी प्रा. देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर झटत आहेत, आनंदी उत्तरे उत्तरायणाचा प्रयोग क्रमांक २२२ यानिमित्ताने खुलला, रंगला, आणि ज्येष्ठांना वर्तमानामध्ये तणाव मुक्त राहण्याचा अनुभव देऊन गेला.




















