Home पुणे पुण्याच्या महापौरपदी मंजूषा नागपुरे!अजितदादांनी दिलेला शब्द राष्ट्रवादीनं पाळला, पुणे महानगरपालिकेत महिलाराज

पुण्याच्या महापौरपदी मंजूषा नागपुरे!अजितदादांनी दिलेला शब्द राष्ट्रवादीनं पाळला, पुणे महानगरपालिकेत महिलाराज

60
0

पुणे: पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपच्या नगरसेविका मंजूषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली . महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याने निवडणूक औपचारिकता राहिली होती. सिंहगड रोडला प्रथमच महापौर पदाचा मान मिळाला आहे. नागपुरे सलग तिसऱ्यांदा नगरसेवकपदी विराजमान झाल्या आहेत, यंदाच्या निवडणुकीतही त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. पुणे महापालिकेची निवडणूक मैत्रीपुर्ण लढली गेली. देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होईल ठरले होते. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार दिला जाणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली होती. प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी माणिक बाग येथून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

भाजपकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा
बुधवारी पुण्याच्या महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर उपमहापौर पदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली . भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी बैठकीत या नावांची घोषणा केली . तसेच आता पुण्याच्या महापौर व उपमहापौर निवडीनंतर फटाके उडवू नका, गुलाल उडवू नका, अशा सूचना भाजपाकडून सर्व नगरसेवकांना देण्यात आल्या होत्या.कुठल्याही पद्धतीचे बॅनर किंवा फटाके लावू नका. अजित पवारांच्या निधनानंतर भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या सूचना सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिल्या.

भाजपचे ११९ नगरसेवक निवडून आले
महापौरपदासाठी रंजना टिळेकर, वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे यांच्या नावांची चर्चा होती. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ११९ नगरसेवक निवडून आले आहेत, पुणे पालिकेच भाजपची एकहात्ती सत्ता आली आहे. पुण्याचे महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव झाले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने मोठ्या प्रमाणात महिलांना उमेदवारी दिली होती. ११९ महिलांना संधी दिली होती. त्यापैकी ५० पेक्षा अधिक महिला नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

*अजित दादांनी दिलेला शब्द राष्ट्रवादी पाळला*
पुणे महापालिकेची निवडणूक मैत्रीपुर्ण लढली गेली.देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होईल असे ठरले होते. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार दिला जाणार नाही, अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here