Home Uncategorized *मुर्तिकार संतोष कांबळी यांच्या हस्ते भागोजीशेठ कीर यांच्या जीवनावर आधारित पत्रकाचे प्रकाशन!*

*मुर्तिकार संतोष कांबळी यांच्या हस्ते भागोजीशेठ कीर यांच्या जीवनावर आधारित पत्रकाचे प्रकाशन!*

59
0

“अस्मिता-अभिमान-परंपरा जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध”
अशा भूमिकेतून कार्यरत राहून
शुक्रवार दि. ३० जानेवारी २६ रोजी अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ पुरस्कृत भागोजीशेठ स्मृती समितीच्या माध्यमातून माहिम स्थित कोकण नगर येथे दि. १५ फेब्रुवारी २६ महाशिवरात्री दिनी भागोजीशेठ कीर जयंतीनिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेत भागोजीशेठ कीर यांच्या जीवनपटपर उपस्थितांबरोबर संवाद व जयंती निमित्त कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली. *सभेत लालबागच्या राजाचे मुर्तिकार संतोष कांबळी यांच्या हस्ते भागोजीशेठ कीर यांच्या जीवनावर आधारित पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.* या सभेस प्रमुख पाहुणे या नात्याने *समाजसेवक वीरेंद्र तांडेल, कोकण नगरच्या अध्यक्षा सन्मा. उषाताई उ. बांदिवडेकर,* महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, महासंघाचे सरचिटणीस प्रकाश कांबळी, समितीचे अध्यक्ष किशोर केळसकर, कोकण नगरचे सभासद व इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here