Home मुंबई *अ.भा.म.चित्रपट संमेलन २०२६ व चित्रकर्मी महाउत्सव पुर्वतयारीची प्राथमिक बैठक संपन्न*

*अ.भा.म.चित्रपट संमेलन २०२६ व चित्रकर्मी महाउत्सव पुर्वतयारीची प्राथमिक बैठक संपन्न*

63
0

अखिल भारतीय मराठी चित्रपट संमेलन २०२६ व चित्रकर्मी महा-उत्सवाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली पहिली पुर्वतयारी बैठक दि ३१ जानेवारी २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीस महाराष्ट्रभरातील चित्रकर्मी, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ व विविध घटकांचा उत्स्फुर्त व उल्लेखनीय प्रतिसाद लाभला.

संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व उपस्थितांनी एकजुटीने सहभाग नोंदवत, “हे संमेलन प्रत्येक चित्रकर्मीचं आहे” ही भावना ठामपणे व्यक्त केली. आगामी काळात हे संमेलन मराठी चित्रपट व्यवसायाला नवी दिशा, नवी ऊर्जा व व्यावसायिक बळ देणारे ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या बैठकीच्या निमित्ताने संपूर्ण मराठी चित्रपट परिवार एकत्र येण्याची सकारात्मक नांदी दिसून आली असून, भविष्यात एकत्रितपणे, समर्थपणे मराठी चित्रपटाचा समृद्ध वारसा पुढे नेला जाईल, असा आश्वासक चित्र स्पष्टपणे उभा राहिला आहे. अशी माहिती , अखिल भारतीय मराठी चित्रपट संमेलन नियोजन समिती २०२६ आयोजकांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here