Home Trending Now RTO विभागात बदल्या, कोल्हापूरचे रोहित काटकर, ठाणे ला पदोन्नतीवर

RTO विभागात बदल्या, कोल्हापूरचे रोहित काटकर, ठाणे ला पदोन्नतीवर

202
0

RTO विभागात बदल्या, कोल्हापूरचे रोहित काटकर, ठाणे ला पदोन्नतीवर

कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच व आचारसंहिता शिथिल होताच राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी वर्गाच्या ११ बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांची कोकण २ महसूल विभागामध्ये ठाणे येथे उपप्रादेशिक अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
ही बदली सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नतीवर करण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून कळविण्यात आले आहे. हे आदेश गुरुवारी गृह(परिवहन) विभागाअंतर्गत मोटार वाहन विभागाने हे आदेश काढले. ते सर्व विभागाला प्राप्त झाले. यामध्ये काही अधिकारी वर्गाने तत्काळ आपला पदभार सोडला आहे.

कोल्हापूर येथील प्रादेशिक अधिकारी रोहित काटकर यांची बदली मनाला चटका लावणारी ठरली. मनमिळाऊ, प्रसन्न व्यक्तिमत्व, कर्मचाऱ्यांमध्ये आदर्शदायी तसेच आपल्या कार्यात कार्यतत्पर आणि सहकार्याच्या भावनेतून कायदेशीर व नियमात कर्तव्य बजावणारे म्हणून रोहित काटकर यांची कोल्हापूर जिल्ह्यात विशेष ओळख होती. रोहित काटकर यांची बदली झालेचे समजताच अनेक हितचिंतक यांनी शुभेच्छा देण्यासाठी सायंकाळी गर्दी केली होती.
या बदली प्रक्रियेमध्ये अन्य बदल्यामध्ये राज्यातील पुणे महसूल विभागात राहुल जाधव यांची पिंपरी चिंचवड तर विजय पाटील यांची सोलापूर व स्वप्नील भोसले यांची पुणे येथे बदली झाली.कोकण २ मध्ये आशुतोष बारकुल यांची कल्याण, अनंत भोसले यांची परिवहन आयुक्त कार्यालय, विजय काळे सिंधुदुर्ग येथे तर समरीन सय्यद यांची मुंबई मध्य येथे बदली केली आहे.
प्रशांत देशमुख यांची अमरावती विभागात यवतमाळ, तर कोल्हापूरचे रोहित काटकर कोकण २मध्ये ठाणे येथे पदोन्नतीवर बदलून गेले आहेत. अनंत जोशी यांची नाशिक महसूल विभागात श्रीरामपूर येथे बदली झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here