Home Trending Now पवार साहेब जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्त असतो – जयंत पाटील

पवार साहेब जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्त असतो – जयंत पाटील

152
0

*पवार साहेब जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्त असतो*

*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 10 जून रोजी अहमदनगर मध्ये वर्धापन दिन*

*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील*

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने १० जागा लढवण्यात आल्या होत्या. त्यापैकी आमच्या पक्षाच्या ८ जागा निवडून आल्या आहेत. हे घवघवीत यश महाराष्ट्राच्या जनतेने आमच्या पक्षाला आणि महाविकास आघाडीला दिलेले आहे. महाविकास आघाडीला निवडणुकीमध्ये तीस जागांवर विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र काम केलं. त्यामुळे महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या आहेत. शरद पवार साहेबांनी कष्ट घेतले. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या सभांमुळे महाराष्ट्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईतील कार्यालयात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नव्याने विजयी झालेल्या ८ खासदारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव होता. त्यासाठी सर्वच नवनियुक्त खासदारांसह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब पक्ष कार्यालयात उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वच विजयी खासदारांची ओळख करुन दिली.

जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कमिटीची ९ जून रोजी बैठक होणार आहे. ही बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देशातील आमच्या वेगवेगळ्या राज्यातील प्रतिनिधी आणि वर्किंग कमिटीचे सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

पुढे जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची स्थापना पवार साहेब यांनी १० जून रोजी केली. त्यामुळे १० जूनला सर्वाधिक महत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे. येणाऱ्या १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दरवर्षी साजरा केला जाणारा पक्षाचा फाऊंडेशन दिन यावर्षी देखील अतिशय दिमाखात आणि उत्स्फूर्तपणाने अहमदनगर शहरात आयोजित करण्याचे ठरले आहे. अहमदनगर येथे संध्याकाळी ५ वाजता अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी जाहीर सभा देखील होणार आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

जयंत पाटील म्हणाले की, आमचे खासदार महाराष्ट्रातील प्रश्न दिल्लीत लावून धरतील. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाना न्याय देण्याचं काम ते करतील. जनतेच्या वतीन आमचे खासदार संघर्ष करतील. शरद पवार साहेबांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून १० जागा लढवण्यात आल्या त्यातील ८ जागांवर विजय आम्हाला मिळाला. त्यामध्ये, बारामती, अहमदनगर आणि बीड लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.’ या तिन्हीही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे, सर्वच उमेदवारांची अधिकृत ओळख सांगताना जयंत पाटील यांनी विशेष उल्लेख केला. जयंत पाटील पहिल्यांचा शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हेंची ओळख करुन दिली. ज्यांना पाडण्यासाठी बड्या-बड्यांनी प्रयत्न केले, पण ते निवडून आले. त्यानंतर, जायंट किलर म्हणून उल्लेख करत बजरंग सोनवणेंचं अभिनंदन केलं. आमच्या पक्षाला बजरंग बली पावला, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार साहेब ज्या बाजुने, त्या बाजुने स्ट्राईक रेट चांगला राहिला आहे. आमचा स्ट्राईक रेट ८० टक्के आहे. त्यामुळे, मी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचे अभिनंदन करतो व जनतेचे आभार मानतो, असेही जयंत पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here