Home Uncategorized *आता १७ ऑक्टोंबर ला बंजारा समाजाची दिवाळी मुंबईत शिवाजी पार्कला….* *माजी खासदार...

*आता १७ ऑक्टोंबर ला बंजारा समाजाची दिवाळी मुंबईत शिवाजी पार्कला….* *माजी खासदार हरिभाऊ राठोड*

70
0

बंजारा समाजाला एस टी.प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे, या मागणी करिता यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चे काढण्यात आला, या मोर्च्यांला समाजातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हजारोंच्या संख्येने महिला युवक सामिल झाले होते. माजी खासदार हरिभाऊ राठोड हेच आपल्याला सवैधानिकरित्या आरक्षण मिळवून देतील हा आत्मविश्वास समाजातून व्यक्त होताना दिसत आहे, जाहीर सभेत हरिभाऊ राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्याला बंजारा समाजाचा इतिहास असून संत सेवालाल महाराज , संत रामराव महाराज तसेच वसंतराव नाईक साहेबांची आठवण करून देत आपल्या भाषणाला सुरुवात केली.
बंजारा समाजात दिवाळी मागण्याची प्रथा आहे, त्यास मेरा म्हटले जाते मेरा मागण्यासाठी १७ ऑक्टोंबर रोजी लाखोच्या संख्येने माता – भगनींना, शिवाजी पार्क दादर मुंबई येथे येण्याचे आव्हान राठोड यांनी केले, “आमची मागणी मान्य न केल्यास सरकारची झोप उडावाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.” अशी घोषणा करत माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here