Home Uncategorized *मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आज लाडक्या बहिणींसाठी बोरिवली येथे शिवणकला प्रशिक्षण व शिलाई मशीनचे...

*मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आज लाडक्या बहिणींसाठी बोरिवली येथे शिवणकला प्रशिक्षण व शिलाई मशीनचे वाटप*

26
0

*मंत्री आशिष शेलार व भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर मार्गदर्शन करणार*

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या मंगळवार, २१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता भाजपा मुंबई आत्मनिर्भर सेल व मुंबई बँकेच्या सौजन्याने लाडक्या बहिणींसाठी बोरिवली (पूर्व) येथे शिवणकला प्रशिक्षण शिबिर आणि शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे.

मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील सहकार भवन, फुलपाखरू उद्यान, टाटा पॉवर, बोरिवली (पूर्व) येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माहिती-तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड. आ. आशिष शेलार आणि विधान परिषदेचे भाजप गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक भाजप मुंबई महामंत्री श्वेता परुळकर व प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी दिली.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here