बालरंगभूमी परिषदेच्या(अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न असलेल्या )
मध्यवर्ती कार्यालयाची उभारणी
माटुंगा येथील माट्यपरिषदेच्या यशवंत नाट्य मंदिर, संकुल माटुंगा येथे करण्यात आली.
दुसर्या मजल्यावरील या कार्यालयाचे उद्घाटन बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष एड नीलम शिर्के सांमत यांच्या हस्ते रविवार दि. ५ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. याप्रसंगी बालरंगभूमी व नाट्यकलेशी संबंधित अनेक रंगकर्मी उपस्थित होते.
शुभारंभ दिनी केलेल्या श्री सत्यनारायण पुजा प्रसादाचा लाभ दिवसभरात महाराष्ट्रभरातून आलेले पदाधिकाऱ्यांसह व रसिकांनीही घेतला
या प्रसंगी एड नीलम सामंत यांनी सांगितले की, “बालरंगभूमीच्या कामात व्यापकता येत आहे. कामाचे नियोजनात सुकरता यावी म्हणून मध्यवर्ती ठिकाणी हे कार्यालय केले आहे. मी स्वतः आठवड्यातून दोन दिवस इथे असणार आहे. आगामी काळात अनेक उपक्रम होणार आहेत. त्यासाठी आमची जोरदार तयारी सुरु आहे.”
बालरंगभूमीला अनेक वर्षांनी प्रयत्नाने छोटीशी का होईना कार्यालयासाठी जागा मिळाली यासाठी अभिनंदन!

















