Home Uncategorized सत्ताधाऱ्यांची असंवेदनशीलता व भीती स्पष्ट दिसतेय, मात्र जनतेच्या लढ्याला आमचा ठाम पाठिंबा...

सत्ताधाऱ्यांची असंवेदनशीलता व भीती स्पष्ट दिसतेय, मात्र जनतेच्या लढ्याला आमचा ठाम पाठिंबा आहे.- आ.शशिकांत शिंदे

68
0

आझाद मैदान, मुंबई येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे संघर्षयोद्धा मनोज
जरांगे पाटील
यांची आंदोलनस्थळी राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पक्षाचे प्रतिनिधींनी भेट दिली.
यावेळी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. “मराठा आरक्षणाच्या बाबतीत ज्या ज्या वेळी आंदोलन झाली त्या त्या वेळी मी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे.” असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांनी म्हटले.
मुंबई अध्यक्ष राखी जाधव , आमदार संदीप क्षीरसागर या वेळी उपस्थित होते

“मनोज दादांचा लढा हा अन्यायाविरुद्धचा, समाजाच्या हक्कांसाठीचा आणि न्यायासाठीचा आहे. त्यांच्या संघर्षातून जनतेला आशा व प्रेरणा मिळत आहे.
या प्रसंगी जनतेच्या हक्कांसाठी लढताना सत्ताधाऱ्यांची असंवेदनशीलता व भीती स्पष्ट दिसतेय, मात्र जनतेच्या लढ्याला आमचा ठाम पाठिंबा आहे.”
असेही आ शिंदे यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here