Home Uncategorized *गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*

*गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*

69
0

*डेहराडून, बडोदा, दिल्ली, बेळगाव, गोवा या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा*

मुंबई
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांची आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य बाहेर मराठी बहुल असणाऱ्या प्रदेशात पाच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमातून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमाकरिता सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

गणेशोत्सवानिमित्त कलाकारांना महाराष्ट्र राज्याबाहेर देखील व्यासपीठ मिळणार आहे. याचाच एक भाग म्हणून २७ ते २९ ऑगस्ट, २०२५ दरम्यान वन संशोधन केंद्र डेहराडून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. उर्वरित कार्यक्रम ०१ सप्टेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे तर 3 सप्टेंबर २०२५ रोजी के एम गिरी सभागृह, बेळगाव या सीमावर्ती भागात गणेशोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. सर सयाजीराव नगर ग्रह वडोदरा गुजरात या ठिकाणी ४ सप्टेंबर २०२५ रोजी भाग्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. तसेच ५ सप्टेंबर २०२५ रोजी गोवा या राज्यात मराठी बांधवांसाठी भव्य अशा संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

“रसिक प्रेक्षकांनी या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा.” असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केली आहे.
000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here