*भांडुपमध्ये मराठा भवन उभारण्यात यावे.*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाज सेवकाचे भावनिक आवाहन
पत्राची प्रत पंतप्रधान कार्यालय, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उप मुख्यमंत्री अजित पवार यांनाही रवाना
मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
जय शिवराय!
मी मनोहर यशवंत शिंदे, गेली अनेक वर्षे भांडुपमध्ये मराठा समाजाचा सेवक आहे. आजारामुळे सक्रिय नाही, पण मराठा समाजाच्या हितासाठी अजूनही मी प्रयत्नशील आहे.
मराठा समाजाने शांततामय मार्गाने अनेक आंदोलने केली, अनेकांनी बलिदान दिले. श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात झालेली आंदोलने, मोर्चे आणि उपोषण यामागचा एकच उद्देश – OBC मधून न्याय्य आणि टिकाऊ आरक्षण.
पूर्वी तुमचं सरकार असताना मिळालेलं आरक्षण न्यायालयात टिकू शकलं नाही. आता तुमच्याकडे सत्तेची ताकद आहे, बहुमत आहे. तरीही OBC मध्ये इतर १७ जातींना सामावून घेतलं, पण मराठ्यांना नाही. हे विरोधाभास आणि दुजाभाव दर्शवतात. त्यामुळे मागणी आहे की OBC मधूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावे, जे कायद्याने व टिकाऊ असेल.
दुसरी विनंती अशी आहे की, भांडुपमध्ये मराठा समाजासाठी एक ‘मराठा भवन’ उभारण्यात यावे. येथे सर्व विभागातील मराठे राहत असून एकत्रित कार्यासाठी एक जागेची नितांत गरज आहे. मराठा समाजाच्या कल्याणासाठी हे भवन अत्यंत उपयुक्त ठरेल. SRA प्रकल्पातून किंवा BMC भूखंडाद्वारे हे शक्य होऊ शकते.
हे पत्र राजकीय टीका करण्यासाठी नसून, एक सामाजिक बांधिलकी आणि तळमळीने लिहलेले आहे. आपल्याकडे मोठी सत्ता असून, निर्णयक्षमता आहे. त्यामुळे आपण हे दोन्ही निर्णय तातडीने घ्यावेत ही विनंती.
आपला नम्र,
मनोहर यशवंत शिंदे
भांडुप (मुंबई)
एक मराठा, लाख मराठा


















