Home Uncategorized *पोस्ट झाले अत्याधुनिक* *भारतीय पोस्टाची देशभरात ‘अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी’सुरू*

*पोस्ट झाले अत्याधुनिक* *भारतीय पोस्टाची देशभरात ‘अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी’सुरू*

66
0

नवी दिल्ली
वर्तमान वेगवान डिजिटल प्रवासात, भारतीय पोस्टाने ही झेप घेतली असून ,देशभरात ‘अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी’ सुरू केली आहे. ५,८०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह , ‘अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी’ प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी “या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे ‘इंडिया पोस्ट’ ही एक जागतिक दर्जाची सार्वजनिक लॉजिस्टिक्स संस्था म्हणून उदयास येईल.” असे सांगितले.
‘डिजिटल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेवर आधारित असा हा संपुर्णपणे स्वदेशी प्लॅटफॉर्म आहे. हे नवीन तंत्रज्ञान ‘इंडिया पोस्ट’ ला आधुनिक लॉजिस्टिक्स कंपन्यांप्रमाणेच डिजिटल सेवा पुरवणे शक्य करणार आहे.

*यूपीआय (UPI)पेमेंटची सोय* या नवीन तंत्रज्ञानामुळे आता ‘इंडिया पोस्ट’ मध्ये कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना यूपीआय पेमेंट (UPI payments) करता येणार आहे.
*ई-कॉमर्सला चालना*
ई-कॉमर्स क्षेत्राला यामुळे
मोठा फायदा होणार असून, ‘इंडिया पोस्ट’ची सेवा अधिक जलद आणि कार्यक्षम बनेल.

*रिअल-टाइम निर्णय*
यामुळे रिअल-टाइम निर्णय घेणे शक्य होणार असून, कामकाजाचा खर्च कमी होईल.

*डिजिटल बुकिंग ते डिलिव्हरी*
हे तंत्रज्ञान बुकिंगपासून डिलिव्हरीपर्यंत संपुर्ण प्रक्रिया डिजिटल बनवेल.

*डिजीपिन*
डिलिव्हरी अधिक अचूक करण्यासाठी १० अंकी ‘डिजीपिन’ (DIGIPIN) सुविधा यात देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here