Home Uncategorized बोरीवली येथील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते मच्छिंद्र दोंड यांचे देहावसान;

बोरीवली येथील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते मच्छिंद्र दोंड यांचे देहावसान;

95
0

वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
मुंबई
बोरीवली पश्चिम येथील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते मच्छिंद्र दोंड यांचे नुकतेच अल्पकालीन आजाराने निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९६९ साली मच्छिंद्र दोंड हे बोरीवली येथे आले. बोरीवली पश्चिम येथे रेल्वे स्थानकाच्या जवळ वृत्तपत्र विक्रेते म्हणून त्यांनी अनेक वर्षे मुंबईतील वृत्तपत्र व्यवसायाची इमानेइतबारे सेवा बजावली. त्यांच्या पत्नी, मुलगा सुनील आणि सून सुवर्णा हेही वृत्तपत्र विक्रेते म्हणून आजमितीस कार्यरत असून, मुंबई तसेच महाराष्ट्रातील बहुसंख्य सर्व भाषिक वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके त्यांच्याकडे उपलब्ध असतात.
मच्छिंद्र दोंड यांच्या निधनामुळे या परिसरातील वृत्तपत्र विक्रेते तसेच या व्यवसायाशी संबंधितांमध्ये शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here