प्रतिनिधी/ मुंबई
सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजीराव कोलेकर यांच्या पत्नी आणि शेकापचे गडहिंग्लज नेसरीचे माजी आमदार दिवंगत तुकाराम कृष्णाजी कोलेकर यांच्या स्नुषा सईबाई शिवाजीराव कोलेकर(६२)यांचं मालाड इथे नुकतंच अल्पशा आजारामुळे निधन झालं ,त्यांच्या पश्चात मुलगा चेतन मुलगी अंकिता असा परिवार आहे ,गोरेगाव येथील आरे स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मुंबई पोलिस दलातील वरिष्ठअधिकारी,नेसरीच्या कसबा शिक्षण समितीचे पदाधिकारी,मालाडच्या प्रमुख राजकिय पक्षाचे पदाधिकारी , मित्रमंडळी,मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .



















