Home Uncategorized *​’हर घर तिरंगा’ केवळ मोहीम नाही, तर देशभक्तांप्रती आदराचा मानबिंदू; ठाणे जिल्हा...

*​’हर घर तिरंगा’ केवळ मोहीम नाही, तर देशभक्तांप्रती आदराचा मानबिंदू; ठाणे जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम*

63
0

*​अद्वितीय ‘हर घर तिरंगा’; जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी थेट घरी जावून वीरपत्नीचा केला गौरव*

*​ठाणे ‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या निमित्ताने ठाणे जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी उपक्रम राबवित स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवान, माजी सैनिक आणि आणीबाणीविरोधी सत्याग्रहींच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमुळे देशभक्ती आणि त्याग करणाऱ्या व्यक्तींप्रति आदराची भावना अधिक दृढ झाली.
या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्वतः शहीद हवालदार सुधीर धोंडू आंब्रे यांच्या वीरपत्नी सुप्रिया सुधीर आंब्रे यांच्या घरी जाऊन त्यांचे आभार पत्र देऊन सन्मान केला. १७ सप्टेंबर २००१ रोजी जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या सुधीर आंब्रे यांच्या सर्वोच्च त्यागाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
​याचबरोबर, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसिलदारांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शहीद सैनिकांच्या वीरमाता, वीरपिता आणि वीरपत्नींच्या घरी जाऊन आभार पत्र दिले. त्यांच्या त्यागाची आठवण ठेवून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
​माजी सैनिकांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या स्वाक्षरीचे आभार व प्रशंसा प्रमाणपत्र १०,००० हून अधिक माजी सैनिकांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवण्यात आले. त्यांच्या निःस्वार्थ सेवेबद्दल हा विशेष सन्मान करण्यात आला.
​१९७५ च्या आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी लढा दिलेल्या १२९ सत्याग्रहींना देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे आभार व प्रशंसा प्रमाणपत्र तहसिलदारांमार्फत देण्यात आले. त्यांच्या योगदानाला सलाम करत जिल्हा प्रशासनाने त्यांच्याप्रति विशेष आदर व्यक्त केला.
​हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, तहसिलदार सचिन चौधर, जिल्ह्यातील सर्व प्रांत अधिकारी, तहसिलदार, इतर महसूल अधिकारी, कर्मचारी आणि ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने मोलाचा समन्वय साधला.
​’हर घर तिरंगा’ मोहिमेचा भाग म्हणून २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविलेला हा अभिनव उपक्रम, देशासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करण्याची सामाजिक जाणीव निर्माण करणारा ठरला आहे.
000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here