Home Uncategorized आडी मराठी शाळेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण*

आडी मराठी शाळेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण*

76
0

आज शिरगांव, आडी येथील ‘आडी मराठी शाळेच्या’ नूतन वास्तूचे लोकार्पण राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते फित कापून व कोनशीलेचे अनावरणाने करण्यात आले.

“ही नवी इमारत फक्त विटा-मातीची नसून, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची, आशांची आणि उज्ज्वल भविष्यातील पहिली पायरी आहे .”
विद्यार्थ्यांना शिक्षण देताना त्यांच्या आवडी-निवडी ओळखून, नाविन्यपूर्ण पद्धतीने ज्ञान देण्याचे महत्त्व ना. उदय सामंत यांनी अधोरेखित केले. “या शाळेतून भविष्यात वैज्ञानिक, IAS अधिकारी आणि समाजाला दिशा देणारे मान्यवर घडावेत”, अशी अपेक्षा ना. सामंत यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, प्रांताधिकारी जीवन देसाई, तालुका प्रमुख बाबू म्हाप, बंड्या साळवी आदी मान्यवर तसेच शाळेचे आजी-माजी विद्यार्थी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here