Home Uncategorized स्वातंत्र्यदिनानिमित्त खेळाडूंचा उत्साह आणि शिक्षणाचा नवा अध्याय*

स्वातंत्र्यदिनानिमित्त खेळाडूंचा उत्साह आणि शिक्षणाचा नवा अध्याय*

71
0

देशातील पहिले ४ कोटींचे स्वतंत्र कबड्डी स्टेडियम उभारण्यात येणार- ना.डॉ.उदय सामंत

आज कोतवडे येथे तारक मयेकर मित्रमंडळ आयोजित एकदिवशीय तालुकास्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा २०२५ ला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी उपस्थित राहून सर्व खेळाडूंना मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी ना. उदय सामंत यांनी देशातील पहिले ४ कोटी रुपयांचे स्वतंत्र कबड्डी स्टेडियम उभारण्यात येणारअसल्याची घोषणा करून खेळाडूंचा आत्मविश्वास अधिक बळकट केला.
ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते वि.रा.प.कोतवडे, इंग्लिश स्कूल, कोतवडे येथील लायब्ररीचे फीत कापून उद्घाटन केले.
या लायब्ररीत ५,५०० पुस्तकांचा खजिना असून, विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीचा हा नवा दीपस्तंभ ठरणार आहे.

यावेळी सरपंच संतोष बरघोडे, उपसरपंच पिंट्या पड्याल, संस्था संचालक नरेश कांबळे, संस्थेचे उपाध्यक्ष संजय मयेकर, मुख्याध्यापक प्रेमदास पवार, तालुका प्रमुख बाबू म्हाप, बंड्या साळवी, युवा तालुका प्रमुख तुषार साळवी यांसह तारक मयेकर मित्रमंडळ आणि कब्बडी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here