Home Uncategorized स्वातंत्र्य दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात भूषण गगराणी यांच्या हस्ते ध्वजारोहण*

स्वातंत्र्य दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात भूषण गगराणी यांच्या हस्ते ध्वजारोहण*

67
0

भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी गगराणी यांनी मुंबईकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पुर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सहआयुक्त, उप आयुक्त, संचालक, सहायक आयुक्त, खातेप्रमुख, इतर अधिकारी, कर्मचारी, नागरिक यावेळी उपस्थित होते.
सोहळ्याच्या प्रारंभी महानगरपालिका मुख्यालयासमोरील सर फिरोजशहा मेहता यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भूषण गगराणी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. महापौर कार्यालयात कै. वासुदेव बाळकृष्ण वरळीकर यांच्या तैलचित्राला देखील त्यांनी पुष्पहार अर्पण केला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल आणि सुरक्षा पथकाच्या वतीने गगराणी यांना मानवंदना देण्यात आली.

याप्रसंगी गगराणी यांनी मुंबईकरांना संबोधित करताना म्हटले की, “नवीन भारताची शक्ती आणि सार्वभौमत्व टिकवण्यासाठी आपण सर्वजण सज्ज आहोत. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची नवीन ओळख संपुर्ण जगाला झाली . ती ओळख अधिक समर्थपणे पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी आज शपथ घेऊया. बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांच्या सेवेमध्ये सातत्याने प्रयत्न करत असते. सर्व मुंबईकरांचे प्रेम बृहन्मुंबई महानगरपालिकेला सदैव लाभू देत.”

*मा. राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्वक सेवा पुरस्कार जाहीर झालेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार*

भारताचे माननीय राष्ट्रपती यांच्याकडून, गुणवत्तापूर्वक सेवेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाचे वरिष्ठ केंद्र अधिकारी संतोष रावसाहेब इंगोले, अग्निशामक सुनिल सुरेश देसले आणि अग्निशामक योगेश हनमंत कोंडावार यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

महानगरपालिका सचिव खात्याकडून दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या ‘ बृहन्मुंबई महानगरपालिका वार्षिक प्रकाशन २०२५’ या पुस्तिकेचे गगराणी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here