Home Uncategorized *विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शिवाजीनगर येथील केदारनाथ मंदिरात अभिषेक, आरती...

*विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शिवाजीनगर येथील केदारनाथ मंदिरात अभिषेक, आरती व दर्शन*

66
0

पुणे, विधान परिषद उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज शिवाजीनगर येथील प्रसिद्ध केदारनाथ मंदिरात अभिषेक करून आरती केली आणि भगवान केदारनाथांचे दर्शन घेतले. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती होती.

अभिषेक व आरतीनंतर देवस्थानच्या विश्वस्त मंडळातर्फे डॉ. गोऱ्हे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी मंदिर परिसरातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची माहिती जाणून घेतली तसेच भाविकांच्या सोयीसुविधांसाठी उपयुक्त असे काही मुद्दे अधोरेखित केले.

डॉ. गोऱ्हे यांनी भगवान केदारनाथांच्या चरणी महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली. तसेच समाजहितासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतःच्या कार्यातून सातत्याने योगदान देण्याचा संकल्प पुन्हा दृढ केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here