अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत एस टी कामगाराच्या मुलीचे घवघवीत यश
मुंबई
धाराशीव जिल्हा कळंब तालुक्यातील
संपदा अशोक रणदिवे हिने अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परिक्षा (ए.आय.ए.सि.जि.ई.टी.) या देश पातळीवरील परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून देशात चौथा तर सर्वसाधारणमध्ये देशपातळीवर ७७ वा क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. या यशाबद्दल संपदाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. संपदा हिचे प्राथमिक शिक्षण कळंब येथे झाले. तद्नंतर अंबाजोगाई योगेश्वरी येथील महाविद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले
आयुषमध्ये पदवी मिळवल्यानंतर पदवीत्तर शिक्षण घेण्यासाठी देशपातळीवरील एआयएपीजीईटी म्हणजे ऑल इंडिया आयुष पदव्युत्तर प्रवेश परिक्षा द्यावी लागते. नॅशनल टेस्टींग एजन्सी ( एन.टी.ए.) सदर परिक्षा घेते. यासाठी देशभरातील आयुष, युनानी पदवीधरांसाठी २ हजार २७४ जागा उपलब्ध असतात. सन २०२५ मध्ये यासाठी ४२ हजार डॉक्टरांनी परिक्षा दिली होती. यात संपदा अशोक रणदिवे यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून देशात चौथा तर सर्वसाधारणमधून देशपातळीवरील ७७ वा क्रमांक मिळवत आपले पदव्युत्तर शिक्षणासाठी स्थान निश्चित केले आहे.
संपदाचे वडील अशोक रणदिवे
हे राज्य परिवहन महामंडळाच्या कळंब आगारात यांत्रिकी म्हणून कार्यरत आहेत.एका एस .टी.
कामगाराच्या मुलीने मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे.
वैद्यकिय प्रवेश पात्रता परीक्षेत घवघवीत यश मिळवत नांदेड येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित केला होता. या ठिकाणी, सातत्यपूर्ण अभ्यास करत चांगला रँक मिळवत बी.ए.एम्सची पदवी प्राप्त केली. लहानपणापासून अभ्यासू असलेल्या संपदा हिने एवढ्यावरच न थांबता पुढील उच्च शिक्षण घेण्याचा संकल्प केला होता. यानुसार तिने प्रवेश पात्रता परीक्षा दिली व घवघवीत यश मिळवले.














