विविध संघटनांचा मुंबईत महाविकास आघाडीला पाठिंबा
*भारतीय दलित पॅन्थर चा उत्तर मुंबईत महाविकास आघाडीला पाठिंबा*
भारतीय दलित पॅन्थर चे मुंबई प्रदेश अध्यक्ष अपरांत कांबळे यांनी नुकतीच उत्तर मुंबईतील भारत जोडो अभियानाच्या बैठकीत उपस्थिती दर्शवली व बैठकीनंतर यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर जे ज्या संविधान समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते ते संविधान व त्यातून मिळालेल्या लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही भारत जोडो अभियानासोबत आहोत, तसेच यासाठीच भाजपा महायुतीला विरोध करत महाविकास आघाडीच्या उमेदवारास आम्ही भारतीय दलित पॅन्थर मार्फत मतदान करण्याचे जाहीर करतो.”
*कष्टकरी शेतकरी संघटनेचा मुंबईत महाविकास आघाडीला पाठिंबा*
श्रमिक मुक्ती आंदोलन, महाराष्ट्र आदिवासी मंच व कष्टकरी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल लाड यांची नुकतीच उत्तर मुंबईचे भारत जोडो अभियानाचे समन्वयक आशुतोष शिर्के, प्रमोद शिंदे, किरण जाधव यांच्या सोबत चर्चा झाली. चर्चेनंतर विठ्ठल लाड यांनी सांगितले की, “महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या मूळे देश भरातील सामान्य माणूस त्रस्त आहे आणि सत्ताधारी मात्र मस्त मजेत आहेत. त्यामूळे सर्वांनी आपला भारतीय तिरंगा लक्षात ठेवून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करून कुशासन घालवून सूशासन आणूया, हा देश आपला आहे त्याला सूरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे म्हणून सर्वांनी जबाबदारीने मतदान करूया …!
*गुजरात मधील संत रोहिदास वाडियार चर्मकार समाजाचा उत्तर मुंबईत महाविकास आघाडीला पाठिंबा*
संत रोहिदास वाडियार चर्मकार समाजाचे चारकोप चे अनेक पदाधिकारी यांनी नुकतीच उत्तर मुंबईतील भारत जोडो अभियानाच्या बैठकीत उपस्थिती दर्शवली व बैठकीनंतर यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानामुळे आम्हाला आज समानता दिसत होती आमची मुलं प्रगती करत होती ते संविधान संपविण्याचे काम भाजपा सरकार करत आहे त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी आम्ही भारत जोडो अभियानासोबत आहोत, तसेच यासाठीच भाजपा व महायुतीला विरोध करत महाविकास आघाडीच्या उमेदवारास आम्ही संत रोहिदास वाडियार चर्मकार समाजामार्फत मतदान करण्याचे जाहीर करतो.”

















