Home मुंबई सरकारचे काम देश चालवणे,पण पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांच्या मागे लागले – आदित्य ठाकरे

सरकारचे काम देश चालवणे,पण पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांच्या मागे लागले – आदित्य ठाकरे

157
0

सरकारचे काम देश चालवणे,पण पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांच्या मागे लागले – आदित्य ठाकरे

*४ जून रोजी दिल्लीत बदल होणार !*

*अडीच वर्षांत मुंबईची अवस्था बिकट झाली*

*दक्षिण मुंबई लोकसभेचे उमेदवार अरविंद सावंत आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या प्रचारासाठी लोखंडवाला आणि मुंबादेवी येथे सभा संपन्न*

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार, आदित्य ठाकरे यांची दक्षिण मुंबई लोकसभेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी मुंबादेवी आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या प्रचारासाठी लोखंडवाला येथे सभा संपन्न झाली . यावेळी दोन्ही सभांना मुंबईकरांनी भरघोस प्रतिसाद दिला . या सभेला शिवसेना नेते अनिल परब, खासदार प्रियांका चतुर्वेदी , राष्ट्रवादीचे नरेंद्र बर्वे, काँग्रेसचे माजी आमदार बलदेव खोसा, विभाग संघटक राजूल पटेल, यांच्यासह मविआ आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते .

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘२० मे रोजी निवडणुका आहेत, कृपया सगळ्यांनी मतदान करा, या निवडणुकीला दोन महिने लागलेत, त्यामुळे लोक गावोगावी रजेवर जात आहेत . मात्र तरीही लोकांमधे उत्साह कायम आहे . कारण हा लढा संविधानाच्या रक्षणाचा आहे’.

*सरकारचे काम देश चालवणे, पण पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांच्या मागे लागले*

आदित्य ठाकरे यांनी सभेतील भाषणात सरकारवर  हल्लाबोल केला . यावेळी ते म्हणाले की  पंकजा मुंडे म्हणाल्या ‘आम्हाला ४०० पार द्या, आम्हाला संविधान बदलावे लागेल’,  आता प्रचार दिवसेंदिवस चिघळत चाललाय . आज आपण काय केले आणि भविष्यात काय करणार आहोत याची चर्चाच होत नाही . दोनदा निवडून देऊन भाजपा आम्हाला विसरली . आणि सरकारचे काम देश चालवणे, पण पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांच्या मागे लागलेत  . भाजपला पराभूत करण्याची वेळ आली की ते हिंदू मुस्लिमांच्या मागे लागतात’.

*४ जून रोजी दिल्लीत बदल होणार आहे*

येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमधे देशात परिवर्तन होईल असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला . यावेळी बोलताना ते म्हणाले की ‘2014 पूर्वी पेट्रोलचे दर एक रुपयानेही वाढले तर भाजपावाले आंदोलन करायचे . लोकांना केवळ जुमले दिले जात आहेत ,  लोक आता या फसवेगिरीला बळी पडणार नाही . सगळे भ्रष्ट भाजपसोबत गेले आहेत . पण येत्या ४ जून रोजी दिल्लीत बदल होणार आहे . असं आदित्य ठाकरे म्हणाले .

*मुंबई देशाची आर्थिक शक्ती, भाजपला हेच बदलायचय*

मुबईचे महत्त्व भाजपला कमी करायचं आहे . अशी टीका आदित्य ठाकरे यांनी भाजपावर केली , यावेळी ते बोलताना म्हणाले ‘मुंबई ही देशाची आर्थिक शक्ती आहे, आणि भाजपला हेच बदलायचे आहे . अडीच वर्षांत मुंबईची अवस्था बिकट झाली आहे . हलक्या पावसात रस्त्याची कामं सुरू आहेत .  आणि आम्ही केलेले काम लोकांसमोर आहे . मुंबईला आजचा सर्वात मोठा धोका पर्यावरणापासून, क्लायमेट बदलातून झाला आहे, तसचं तो तानाशहापासूनही आहे’ .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here