Home Uncategorized *सहाय्यक वाहतूक अधिकारी (ATO) प्रशिक्षण वर्ग*

*सहाय्यक वाहतूक अधिकारी (ATO) प्रशिक्षण वर्ग*

67
0

*बेस्ट कामगार सेना आयोजित बेस्टचा कामगार वर्गास मोफत सहाय्यक वाहतूक अधिकारी (ATO) प्रशिक्षण वर्ग* क्षत्रिय भावसार हॉल परेल येथे पार पडले.सकाळच्या सत्राचे उदघाटन श्री रंजन भाई चौधरी, सरचिटणीस बेस्ट कामगार सेना,यांच्या शुभ हस्ते पार पाडलं.
सदर शिबिर सकाळी ८.३० ते ४ या वेळेत घेण्यात आले सदर प्रसंगी प्रशिक्षक कमलाकर जाधव,( माजी व्यवस्थापक) जमील मुल्ला( माजी आगार व्यवस्थापक), प्रकाश राणे( माजी उप मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी) इत्यादी मान्यवर उपस्थित झाले, प्रशिक्षण वर्गाची सुरुवात ठीक सकाळी 8-30 वाजता प्रशिक्षण वर्गाच्या पहिल्या सत्राची सुरुवात झाली.
दुपारच्या सत्राचे उद्घाटन शिवसेना उपनेते,बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांच्या हस्ते झाले.
तद प्रसंगी प्रशिक्षक सदानंद शेट्ये ( माजी आगार व्यवस्थापक ), जमील मुल्ला ( माजी आगार व्यवस्थापक ), प्रकाश राणे ( माजी उपमुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी ), मा गोपाळ सामंत ( माजी उप मुख्य वाहतूक व्यवस्थापक )यांनी मार्गदर्शन केले.सदर शिबिरास शिवसेना माजी नगरसेवक माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांनी सर्व कामगार वर्गास शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here