*सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज केंदूर मध्ये शालेय दप्तर , परीक्षा पॅड आणि गुरुदेव शिक्षक यांना पेन वाटप*.
किसान स्पोर्ट करिअर अकॅडमी महाराष्ट्र राज्य ,रमेशभाऊ येवले प्रतिष्ठान आणि विरंगणा मीडिया टीम यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज केंदूर मधील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरे , तसेच इयत्ता 5 वी ते 12 वी मध्ये प्रथम , द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना पॅड वाटप ,तसेच विद्यालयातील सर्व गुरुदेव शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पेन वाटप करण्यात आले .

किसान ऑल स्पोर्ट करिअर अकॅडमी महाराष्ट्र चे अध्यक्ष संजय तांबे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की विद्यालयात लाठी काठी , घोडेस्वारी , दानपट्टा ,तलवारबाजी , ज्युडो कराटे सर्व मर्दानी खेळाचे प्रशिक्षण मोफत देणार आहे.
त्यामुळे विशेषता विद्यार्थिनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी समर्थ ठरतील .
सदर कार्यक्रमासाठी सिने अभिनेते भूषण घोलप, प्रशिक्षक मिलिंद ठोके , सागर भाऊ वर्पे, मोहन घोलप, अविदादा मासळकर , अभी कामठे, ओंकार मासळकर , ज्ञानेश्वर मासळकर , मनोज खुळे, कपिल सर , शीतल वीर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाचे प्राचार्य अनिल साकोरे यांनी केले तर आभार स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर चे पुणे विभागीय सदस्य राम साकोरे यांनी केले.



















