शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि उपनेते डॉ नितीन नांदगावकर यांचा दणका
राज्यातील खाजगी आणि सार्वजनिक रुग्णालयातून रुग्णांकडून डॉक्टर व्हिजिटच्या नावाने वा डॉक्टर प्रिव्हिलेज शुल्कच्या नावाने आकरले जाणारे भुर्दंड रुपी पैसे यापुढे रुग्णांकडून आकरले जाणार नाही अशी हमी विविध खाजगी रुग्णालयाकडून शिवसेनेला देण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते डॉ नितीन नांदगावकर यांनी या संदर्भात सर्व रुग्णालयाना विशेष विनंतीपत्र पाठवून रुग्णांकडून ह्या प्रकारचे शुल्क यापुढे आकारले तर शिवसेनेचा दणका काय असतो ते पाहायला मिळेल अशी तंबी दिल्यावर लागलीच खाजगी रुग्णालयानी यापुढे असे शुल्क आकारणार नाही अशी हमी दिली.
सर्वसाधारण रुग्णांना या डॉक्टर प्रिव्हिलेज चार्जेस मुळे हजारो रुपये विनाकारण खर्च करावे लागत होते. विविध रुग्णालय डॉक्टर व्हिजिट च्या नावाने भरमसाठ शुल्क आकरतात यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातलगना विनाकारण भुर्दंड सोसावा लागतो. हा खर्च आटोक्यात आणण्यात रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना यश येईल. जर एखादे रुग्णालय असा भुर्दंड लादत असेल तर लगेच आपल्याला कळवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तुमच्या मदतीला लगेच उभा राहून हे शुल्क रुग्णालयाला आकारू देणार नाही याची खात्री बाळगा असे आवाहन उपनेते डॉ नितीन नांदगावकर यांनी केले आहे.



















