Home पुणे *डॉ.बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टीधारकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याबाबत आराखडा तयार करा-विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टीधारकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याबाबत आराखडा तयार करा-विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे*

234
0

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टीधारकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याबाबत आराखडा तयार करा-विधानपरिषदेचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे*

 

पुणे, दि. 10: पुणे शहरातील चंदन नगर परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या झोपडपट्टीधारक व त्यांच्या कुंटूबियांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याकरीता आराखडा तयार करा, याकरीता पुणे महानगरपालिका, झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय आणि बाधित कुटुबिंयाच्या प्रतिनिधींसोबत मंगळवार, 13 मे रोजी बैठक आयोजित करून कुटुंबियांच्या अडीअडचणी सोडविण्यावर भर द्यावा, असे निर्देश विधानपरिषदेचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टीला 23 एप्रिल, 2025 रोजी लागलेल्या आगीत जळून नुकसान झालेल्या झोपडपट्टीधारक व त्यांच्या कुंटूबियांना शासनाकडून नुकसानभरपाई व पुनर्वसन करण्याबाबत दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,मुख्य अधिकारी झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे तसेच सर्व संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत बाधित झोपडपट्टीधारक व त्यांच्या कुंटूबियांला पुणे महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने वेळेत जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात आला आहे. या बाधित कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने पंचनामे करण्यात आले आहेत. परंतु या कुटुंबियांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. या कुटुंबियांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याकामी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, जेणेकरुन नागरिकांचे लवकरात लवकर पुनर्वसन होण्यास मदत होईल.पुणे महानगरपालिकाच्यावतीने या कुटुंबियांना पर्यायी गृहनिर्माण व्यवस्था करण्याबाबत विचार करावा. तसेच झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणांनी आपल्या योजनांसोबतच इतर पर्यायीमार्गाचा अबलंब करुन घरे उपलब्ध करुन देण्याचा विचार करावा. या कुटुंबियांना पुनर्वसनाबाबत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत माहिती द्यावी.

डॉ. भोसले म्हणाले, चंदननगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत बाधित कुंटूबियांचे कायमस्वरुपी पुनर्वसनाबाबत पुणे महानगरपालिकेच्यावतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येतील, याबैठकीत दिलेल्या सूचनांचा सकारात्क विचार करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही डॉ. भोसले म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टीला लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या झोपडपट्टीधारक व त्यांच्या कुंटूबियांची जिल्हाधिकारी कार्यालय व पुणे महानगरपालिकेच्यावतीने तात्पुरती व्यवस्था शाळेत करण्यात आली होती, त्यांना जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात आला होता. याबाधित कुटुंबियांना मदत मिळण्याच्याअनुषंगाने पंचनामे करुन मुख्यमंत्री सहायता निधीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, त्याला लवकरच मंजुरी मिळणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रति कुटुंब 1 लाख 30 हजार रुपये इतकी मदत मिळणार आहे. या नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याकरीता पुणे महानगर पालिका आणि झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणास जिल्हा प्रशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. डुडी म्हणाले.

श्री. गटणे म्हणाले, झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याकरीता करण्यात येणारे अंतिम टप्पात आहेत. सुमारे 533 झोपड्यांची पात्रता यादी तयार करण्यात आली आहे. विकासकांची मदत घेतली जात आहे. पुणे महानगरपालीकेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकांकरीता बांधण्यात आलेल्या प्रकल्पामध्ये या कुटुंबियांचे स्थलांतर करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे, यापद्धतीने तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांच्या सहभागानुसार त्यांचे स्थलांतर करण्यात येणार आहे, असेही श्री. गटणे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here