Home Uncategorized *जत येथे नवे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय* —- परिवहन मंत्री प्रताप...

*जत येथे नवे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय* —- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

219
0

मुंबई :(९ मे ) जत,जि. सांगली येथील वाहन नोंदणी संख्या, एकूण लोकसंख्या याचा विचार करता स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करणे गरजेचे होते. त्यामुळे जतला (MH- 59 या नावाने ) नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की,जत चे स्थानिक आमदार गोपिचंद पडळकर यांनी जत येथे मोटार परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात यावे, यासाठी पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने परिवहन विभागाने सदर ठिकाणी परिवहन कार्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करून शासन निर्णय जाहीर केला आहे.या निर्णयामुळे सांगली पासून सुमारे १००-१२० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जत तालुक्यातीन सर्वसामान्य जनतेला परिवहन विषयक कामासाठी आता सांगली या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी यावे लागणार नाही. त्यामुळे साहजिकच त्यांच्या वेळ, श्रम आणि पैशाची बचत होणार आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

(अभिजीत भोसले)
जनसंपर्क अधिकारी
मा.मंत्री परिवहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here