पुणे जिल्हय़ातील मुळशी तालुक्यातील पौड येथील नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीसमोर विटंबनेची घटना घडली असून अशा घटनांचा पुनरावृत्ती होता कामा नये. याबाबत दक्षता घेण्यात यावी आणि आरोपीवर कडक शिक्षा देण्यात यावी,या दृष्टीने पावल उचलण्यात यावी,असे निर्देश उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांनी ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख यांना दिले.
पुणे जिल्हय़ातील विविध प्रश्नाबाबत उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांच्यासोबत ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख यांच्या सोबत बैठक झाली.त्यामध्ये जिल्हय़ातील विविध प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा देखील झाली.
या बैठकीनंतर उपसभापती नीलम ताई गोऱ्हे म्हणाल्या, पुणे जिल्हय़ातील बारामती तालुक्यातील महादेव मळा येथील एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.मात्र आरोपी वर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसून आरोपीवर कारवाई करण्यात यावी,असे निर्देश देण्यात आले.तर या पुढील अशा घटना घडता कामा नये,त्या दृष्टीने विविध भागात वेळोवेळी गस्त वाढविण्यात यावी,तसेच महिला आणि तरुणीवर होणाऱ्या अन्याय अत्याचार रोखण्यासाठी निर्भय बनो आणि बडी कॉप च्या माध्यमांतून कशा प्रकारे काम करता येतील,याबाबत चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या, राजगुरूनगर येथील एका तरुणीवर अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.तर या प्रकरणातील आरोपीला कडक शासन झाले पाहिजे.याबाबत प्रशासनाने वेगाने पावल उचलली पाहिजे,याबाबत निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या,पुणे जिल्ह्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसात अपघाताच्या घटना घडल्या आहेत.त्या अपघातामध्ये अनेकांचे मृत्यू झाले आहेत.तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.या घटना रोखण्यासाठी पोलिस विभागामार्फत वाहतुकीचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात यावे, तसेच या रस्त्यावर बंद असलेल्या मोठ्या वास्तुमध्ये रुग्णालय सुरू करण्यात यावे,जेणेकरून अपघात ग्रस्ताना तात्काळ उपचार देण्यास मदत होईल,याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या,*पुणे जिल्हय़ातील नागेश्वर मंदिरातील घटनेची पुनरावृत्ती होता कामा नये,पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांना नीलम ताईं गोऱ्हे यांचे निर्देश*
पुणे जिल्हय़ातील मुळशी तालुक्यातील पौड येथील नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीसमोर विटंबनेची घटना घडली असून अशा घटनांचा पुनरावृत्ती होता कामा नये. याबाबत दक्षता घेण्यात यावी आणि आरोपीवर कडक शिक्षा देण्यात यावी,या दृष्टीने पावल उचलण्यात यावी,असे निर्देश उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांनी ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख यांना दिले.
पुणे जिल्हय़ातील विविध प्रश्नाबाबत उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांच्यासोबत ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख यांच्या सोबत बैठक झाली.त्यामध्ये जिल्हय़ातील विविध प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा देखील झाली.
या बैठकीनंतर उपसभापती नीलम ताई गोऱ्हे म्हणाल्या, पुणे जिल्हय़ातील बारामती तालुक्यातील महादेव मळा येथील एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.मात्र आरोपी वर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसून आरोपीवर कारवाई करण्यात यावी,असे निर्देश देण्यात आले.तर या पुढील अशा घटना घडता कामा नये,त्या दृष्टीने विविध भागात वेळोवेळी गस्त वाढविण्यात यावी,तसेच महिला आणि तरुणीवर होणाऱ्या अन्याय अत्याचार रोखण्यासाठी निर्भय बनो आणि बडी कॉप च्या माध्यमांतून कशा प्रकारे काम करता येतील,याबाबत चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या, राजगुरूनगर येथील एक तरुणीवर व दोन बहिणींवर अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.तर या प्रकरणातील आरोपीला कडक शासन झाले पाहिजे.याबाबत प्रशासनाने वेगाने पावल उचलली पाहिजे,याबाबत निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या,पुणे जिल्ह्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसात अपघाताच्या घटना घडल्या आहेत.त्या अपघातामध्ये अनेकांचे मृत्यू झाले आहेत.तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.या घटना रोखण्यासाठी पोलिस विभागामार्फत वाहतुकीचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात यावे, तसेच या रस्त्यावर बंद असलेल्या मोठ्या वास्तुमध्ये रुग्णालय सुरू करण्यात यावे,जेणेकरून अपघात ग्रस्ताना तात्काळ उपचार देण्यास मदत होईल,याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या,पुणे जिल्हय़ातील पर्यटन स्थळांना राज्याच्या अनेक भागातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात.त्या पर्यटकांच्या दृष्टीने त्या ठिकाणी स्वच्छता ठेवली पाहिजे.तसेच सुरक्षा रक्षक देखील नेमले पाहिजे, याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून येत्या कालावधीत लवकरच अंमलबजावणी केली जाईल असे ग्रामीण अधीक्षक यांनी सांगितले.