Home महाराष्ट्र वातावरणीय बदलासंदर्भात संयुक्त तदर्थ समिती”आणि “ग्रंथालय समिती” वर विधानपरिषद सभापती डॉ. नीलम...

वातावरणीय बदलासंदर्भात संयुक्त तदर्थ समिती”आणि “ग्रंथालय समिती” वर विधानपरिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची”विशेष निमंत्रित सदस्य” म्हणून नियुक्ती*

148
0

 

• *”वातावरणीय बदलासंदर्भात संयुक्त तदर्थ समिती”*
*आणि “ग्रंथालय समिती” वर*
*विधानपरिषदेच्या मा.उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची*
*”विशेष निमंत्रित सदस्य” म्हणून नियुक्ती*

मुंबई दिनांक २५ एप्रिल, २०२५

वातावरणीय बदलासंदर्भात संयुक्त तदर्थ समिती सन २०१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात समितीचा प्रस्ताव संमत झाला होता. यासमितीची पुर्नरचना काही दिवसांपूर्वी झाली होती. याच समितीवर महाराष्ट्र विधानपरिषद सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केली.

समिती पध्दतीला संसदीय लोकशाहीमध्ये अनन्यसाधारण महत्व असून नि:सत्र कालावधीत समिती कामकाजाच्या माध्यमातून कायदेमंडळाचे कार्यकारी मंडळावरील नियंत्रणाचे कार्य सुरु असते. भारतीय राज्यघटनेतील सत्तानियंत्रण आणि सत्तासंतुलन (Check and Balance) हे तत्व समितीपध्दतीमुळे अधिक प्रभावीपणे अंमलात येत असते. “वातावरणीय बदलासंदर्भात संयुक्त तदर्थ समिती” आणि “ग्रंथालय समिती” वर डॉ. गोऱ्हे यांची “विशेष निमंत्रित सदस्य” म्हणून नामनियुक्ती करण्यात आली आहे.
…….

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here