Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग कवी केशवसुत स्मारक, मालगुंड “पुस्तकांचे गाव” लोकार्पण सोहळा आणि “कोकण साहित्य सन्मान...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड “पुस्तकांचे गाव” लोकार्पण सोहळा आणि “कोकण साहित्य सन्मान दालन” उद्घाटन सोहळा*

122
0

*कवी केशवसुत स्मारक, मालगुंड “पुस्तकांचे गाव” लोकार्पण सोहळा आणि “कोकण साहित्य सन्मान दालन” उद्घाटन सोहळा*

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड “पुस्तकांचे गाव” लोकार्पण सोहळा आणि “कोकण साहित्य सन्मान दालन” उद्घाटन सोहळा मराठी भाषा व उद्योग मंत्री ना उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न. झाला.


महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

वाचन चळवळीची जोपासना व वाचन संस्कृतीचे संवर्धन तसेच मराठी भाषेचा विकास, प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागा अंतर्गत राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने मराठी भाषा विभागाने सुरू केलेला अभिनव उपक्रम म्हणजे पुस्तकाचं गाव .
कवी केशवसुत स्मारक मालगुंड या गावाचाही पुस्तकांचे गाव या उपक्रमात समावेश करण्यात आला .

या उपक्रमाअंतर्गत निवड झालेल्या गावांमध्ये विविध साहित्य प्रकारच्या पुस्तकांची दालने उभारली जातात. कुठल्याही दालनात जाऊन वाचक पर्यटनासोबतच आवडीनुसार विनाशुल्क पुस्तक वाचनाचा आनंद घेऊ शकतात. या उपक्रमाला मराठी भाषिकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन, त्याचा विस्तार करण्यात येत आहे. या विस्तारात रत्नागिरी तालुक्यातील कवी केशवसुत स्मारक मालगुंड या गावाची निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here