कविवर्य *”म.पा.भावे”* यांना जन्मशताब्दी वर्षा निमित्त मानवंदना.
“२१ मार्च जागतिक काव्य दिनाचे औचित्य साधून
बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाच्या, संगीत व साहित्य विभागाच्या वतीने “स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केंव्हा” ह्या अजरामर गीताचे गीतकार, बेस्ट उपक्रमाचे माजी कर्मचारी सुप्रसिद्ध कविवर्य *”म.पा.भावे”* यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त, त्यांना मानवंदना देण्याकरिता त्यांनीच लिहिलेल्या आणि त्यांचे चिरंजीव विकास भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या विनोदी विडंबन गीतांचा संगीतमय कार्यक्रम “अरे संसार संसार” या कार्यक्रमाचे आयोजन, रमेश रणदिवे कलादालन (मिनी थिएटर) आणिक आगार येथे केले होते,
या कार्यक्रमाला कुटुंब रंगलंयकार प्राध्यापक विसूभाऊ बापट उपस्थित होते, सदर प्रसंगी बापट यांनी म.पा.भावे यांनी लिहिलेली एक कविता सादर केली,
या कार्यक्रमाला बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अनिल कोकीळ साहेब, जे.जे.स्कूल ऑफ आर्ट विद्यापीठाचे कुलगुरु विश्वनाथ साबळे, बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाचे सभापती (कला) डॉ.राजेंद्र पाटसुते, सभापती (क्रीडा) धनंजय पवार, सरचिटणीस कला विजय सूर्यवंशी, उप सरचिटणीस कला संगिता पुरव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचा रसिक प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेतला.






















