Home महाराष्ट्र गोदान एक्सप्रेस च्या पार्सल बोगीला आग

गोदान एक्सप्रेस च्या पार्सल बोगीला आग

174
0

मुंबई (प्रतिनिधी):- नाशिक रेल्वे स्थानकातुन भुसावळ कडे जाणाऱ्या गोदान एक्सप्रेस च्या पार्सल बोगी ला आग लागली.रेल्वे गार्ड च्या वेळीच लक्षात आल्याने गाडी थांबवून बोगीची आग विझवण्यात आली.आणि मोठा अनर्थ टळला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुबंई लोकमान्य टिळक टर्मिन्स वरून -गोरखपूर ला जाणारी गोदान एक्सप्रेस आज दुपारी नेहमी प्रमाणे नाशिकरोड रेल्वे स्थानकात आली. स्थानक सोडल्या नंतर गोरेवाडी नजीक, मनपा च्या जलशुद्धकरण केंद्रा जवळून गोदान एक्सप्रेस जात असतांना गाडीच्या मागील पार्सल बोगी मधून धुराचे लोट बाहेर येताना दिसले,काही सेकंदात वारा अधिक लागल्याने बोगी मधून धुरा बरोबर अगीचे लोट येऊ लागले.शेजारील बोगी मधील प्रवासीच्या सदर बाब लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर गाडीच्या गार्ड ला समाजल्या नंतर त्यांनी तात्काळ गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला. गाडी थांबताच प्रवासिनी चालत्या गाडीतून उडय मारल्या. तात्काळ अग्निशमक दलाला कळवण्यात आले मात्र रेल्वे गाडी अडचणी च्या ठिकाणी थांबल्याने त्याना घटनास्थळी पोहचण्यात कसरत करावी लागली. तो पर्यंत रेल्वे कर्मचारी  यांनी फोम च्या सहाय्याने आग विझावण्याचा प्रयत्न केला मात्र आग भडकत होती.स्थानक प्रबंधक श्रीवास्तव,रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक हरफूलसिंह यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश सोननसे, लोहमार्ग पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस हवालदार संतोष उफाडे पाटील, कुलकर्णी आप्पा,आदि सह अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले मात्र हाय टेन्शन असलेला विद्युत पुरवठा पूर्ववत असल्याने बोगी वर पाणी मारणे शक्य नव्हते. अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ बोगी पासून अगीने बाधित बोगी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. बोगी वेगळी झाल्या नंतर गोदान एक्सप्रेस पुढील प्रवासाला रवाना झाली.

या बाधित बोगी च्या शेजारी सर्वसाधारण बोगी होती, मात्र गाडी स्थनकातून सुटल्याने हळू धावत होती, म्हणून जीवितहानी झाली नाही, जर गाडी अजून काही किलोमीटर गेली असती तर मोठी दुर्घटना झाली असती. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी नाशिक कडे रवाना झाले असून या घेतानेची उच्च सत्तरावर चौकशी होईल असे एका रेल्वे अधिकारीने सांगितले.

   बाधित बोगी मध्ये कशाने आग लागली हे मात्र स्पष्ट झाले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here