Home मनोरंजन मुलांना नाट्य कला त्यांच्या कुशीत कवटाळु दे… देवदत्त पाठक

मुलांना नाट्य कला त्यांच्या कुशीत कवटाळु दे… देवदत्त पाठक

150
0

मुलांना नाट्य कला त्यांच्या कुशीत कवटाळु दे… देवदत्त पाठक

*जागतिक बाल रंगभूमी* दिनानिमित्त गुरूस्कूल गुफांन आयोजीत, मुलांच्या भावना बाल रंगभूमी तज्ज्ञ प्रा. देवदत्त पाठक यांनी उजळ नी संवेदित करण्यासाठीं नाट्य कार्य शाळा घेतली,

मुले कायम उत्साही नी क्रियाशील राहण्यासाठी त्यांचें मन, बुध्दी, आणि शरीर यांना *हो रे ची भाषा* शिकवायला हवी. प्रसंगी काहीसे कठोर होवून करायला लावण्याचे धाडस मुलांमध्ये रुजवायलां हवे.. त्यासाठी नाट्य कला, आणि रंगमंचीय खेळ उपयोगी पडतातच.. असे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

*पैली ते चवथी* या शालेय वस्तूंच्या कवितांवरचे मोहक रुपनाट्य आणि *जागतिक महिलादिन साजरा* हे स्त्री चे स्वातंत्र्य की स्वैराचार या विषया वरची २ नाटके देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून या प्रसंगी सादर झाली.

सायली चव्हाण हिने नाट्य संदेशाचे वाचन केले.

प्रांजली, प्रथमेश (इंगळे)सायली, आकांक्षा,अंजली(चव्हाण), आलोक, अक्षता (जोगदनकर), अर्णव देशपांडे, आर्या करपे या बाल कलाकारांनी उपस्थितांची दाद मिळविली.

सामजिक कार्यकर्त्या उषा देशपांडे, सीमा जोगदनकर, ऋतुजा केळकर, रोटारियन हेमंत जेरे, प्राजक्ता जेरें , यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here