Home महिला बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यानेच केला अत्याचार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची तत्काळ दखल;...

बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यानेच केला अत्याचार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची तत्काळ दखल; कठोर शिक्षेचे निर्देश*

147
0

 

*बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यानेच केला अत्याचार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची तत्काळ दखल; कठोर शिक्षेचे निर्देश*

बीड, दि. ९ मार्च २०२५ : बीड जिल्ह्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने सत्काराच्या बहाण्याने एका महिलेला बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातील व्यक्तीकडून असे कृत्य होणे अत्यंत निंदनीय असून, या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक यांना केली आहे.

या प्रकारामुळे संपूर्ण पोलीस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यावर त्वरित कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच पीडितेला तातडीने न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती मदत आणि संरक्षण दिले जावे, पीडितेच्या तक्रारीची योग्य दखल घेत या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्याची मागणीही डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

या घटनेतील आरोपीस त्वरित शिक्षा व्हावी, यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे, अशीही मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले असून, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा आग्रह धरला आहे.

*संपर्क : रोहिणी संपत ठोंबरे ९०८२९९१७८३*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here