Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग *रत्नागिरी जिल्ह्यात २२ नवीन आरामदायी एस.टी. बस सेवेत दाखल* *मंत्री उदय...

*रत्नागिरी जिल्ह्यात २२ नवीन आरामदायी एस.टी. बस सेवेत दाखल* *मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत महिलांच्या हस्ते लोकार्पण*

256
0

*मंत्री उदय सामंत यांनी एस.टी. बसमधून केला प्रवास*

रत्नागिरी, दि. ९ मार्च २०२५ – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी आज एकूण २२ नवीन आरामदायी एस.टी. बसगाड्या दाखल झाल्या. या बस सेवेचे लोकार्पण महिलांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. उदय सामंत प्रमुख उपस्थित होते.

या नवीन बसगाड्यांमुळे जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे. या बसगाड्यांचे वितरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे –

दापोली डेपो – १० बस
रत्नागिरी डेपो – ५ बस
लांजा डेपो – ३ बस
राजापूर डेपो – ४ बस
लोकार्पण सोहळ्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी नव्याने दाखल झालेल्या एस.टी. बसमधून प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

लांजा व राजापूर डेपो मध्ये दाखल होणाऱ्या बस चे लोकार्पण राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, “रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी ३० नवीन बसगाड्या लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे प्रवास अधिक सुलभ, गतिमान आणि सुरक्षित होईल.”

या कार्यक्रमाला एस.टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, स्थानिक जनप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने एस.टी. प्रवासी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here