Home उद्योग / शिक्षण वार्ता महाराष्ट्रातील लॉजिस्टिक्स, पोर्ट्स, आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी डीपी वर्ल्डसोबतच्या भागीदारीच्या संधी

महाराष्ट्रातील लॉजिस्टिक्स, पोर्ट्स, आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी डीपी वर्ल्डसोबतच्या भागीदारीच्या संधी

148
0

 

दावोस येथील महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी डीपी वर्ल्डचे चेअरमन हिज एक्सलन्स सुलतान अहमद बिन सुलायम आणि व्यवस्थापकीय संचालक व सीईओ (भारत व आफ्रिका) रिजवान सूमर यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा केली.

जागतिक व्यापार केंद्र म्हणून भारताचं महत्व वाढतंय, पूर्वेकडील देश व्यापारक्षेत्रासाठी विविधता शोधत आहेत आणि भारत या बदलत्या व्यापाराचा केंद्रबिंदू ठरत आहे. या बाबींचा विचार करून डीपी वर्ल्डने भारताच्या व्यापार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात दीर्घकालीन गुंतवणुकीचे आश्वासन दिले आहे.

सध्या भारत वर्षाला १५ दशलक्ष कंटेनर हाताळत असून, चीनच्या १० दशलक्ष कंटेनरपेक्षा अधिक व्यापार करत आहे. डीपी वर्ल्ड ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंटेनर रेल ऑपरेटर कंपनी आहे आणि ‘भारत मार्ट’साठी जागतिक दर्जाचा अनुभव आणि कौशल्य आणण्याबाबत विचार करत आहे.

डीपी वर्ल्ड सोबत झालेल्या चर्चेत औद्योगिक वाढीसाठी औद्योगिक उद्याने उभारण्याचे सुचवण्यात आले, तसेच राज्यातील दोन सॅटेलाइट बंदरांचा अधिक चांगला उपयोग करण्याच्या संधींबाबत चर्चा झाली. हायपरलूप तंत्रज्ञानाद्वारे लॉजिस्टिक्समध्ये गती वाढवण्याच्या शक्यता वर ही चर्चा झाली.

महाराष्ट्रातील लॉजिस्टिक्स, पोर्ट्स, आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी डीपी वर्ल्डसोबतच्या भागीदारीच्या संधी यावर या बैठकीत भर देण्यात आला.

————

At the Maharashtra Pavilion in Davos, CM Devendra Fadnavis and Industry Minister Uday Samant held a significant discussion with H.E. Sultan Ahmed bin Sulayem, Chairman, and Rizwan Soomar, MD & CEO (India & Africa), DP World.

The conversation emphasized India’s growing strategic importance as a global trade hub, especially as the Far East diversifies. DP World reaffirmed its commitment to long-term investments in India’s trade and logistics sector, highlighting the country’s potential.

India currently handles 15 million containers annually, surpassing China’s 10 million, with DP World being the second-largest container rail operator in the country. The company expressed its vision of bringing global expertise to Bharat Mart, enhancing India’s logistics landscape.

The CM proposed creating industrial parks to drive growth and leveraging Maharashtra’s two satellite ports to boost trade infrastructure. They also explored Hyperloop technology’s potential to revolutionize cargo transport efficiency.

This meeting focused on identifying partnership opportunities to develop logistics, ports, and industrial ecosystems in Maharashtra, aligning with DP World’s expertise and the state’s ambitious growth agenda.

@DP_World

#UdaySamant #WEF25 #UnstoppableMaharashtra #MahaAtDavos

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here