Home उद्योग / शिक्षण वार्ता ६ व ७ मार्च २०२४ रोजी ठाण्यात होणार ‘नमो महारोजगार मेळावा’

६ व ७ मार्च २०२४ रोजी ठाण्यात होणार ‘नमो महारोजगार मेळावा’

163
0

६ व ७ मार्च २०२४ रोजी ठाण्यात होणार ‘नमो महारोजगार मेळावा’

६ व ७ मार्च रोजी ठाण्यात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली “नमो महारोजगार” मेळावा होत असून यात तब्बल अडीचशे कंपन्यांचा सहभाग असणार आहे.

टाटा स्टील, टी सी एस, गोदरेज , एल अँड टी , कोकाकोला , जिंदाल, अमेझॉन , सिप्ला , केलोग्ज , केपजेमिनी , आयसीआयसीआय, एलआयसी अशा मान्यवर कंपन्यांचा सहभाग या मेळाव्यात आहे. या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केंद्रातील अनेक प्रोजेक्ट राज्यामध्ये पूर्ण जोमाने राबवले. त्यातलाच एक प्रोजेक्ट म्हणजे हा महारोजगार मेळावा.

या मेळाव्याची पूर्वतयारी आढावा बैठक नुकतीच पार पडली यात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, कौशल्य विकास विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, पोलीस अपर आयुक्त महेश पाटील, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, गोपीनाथ ठोंबरे तसेच विविध संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here